Humani Control Agrowon
ॲग्रो गाईड

Humani Control : पिकाची मुळे कुरतडणाऱ्या हुमणीचा असा करा बंदोबस्त

White Grub Control : बागायती पिकामध्ये ओलावा आणि अन्नपुरवठा सातत्याने होत असल्यामुळे हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढतो. खरीप तसचं रब्बी हंगामातील पिकांसह प्रामुख्याने ऊस पिकात हुमणीचा प्रादुर्भाव अढळून येतो.या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच सामुदायिक उपाययोजना केल्यातर हुमणीचा प्रादुर्भाव रोखता येतो.

Team Agrowon

Crop Protection : बागायती पिकामध्ये ओलावा आणि अन्नपुरवठा सातत्याने होत असल्यामुळे हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढतो. खरीप तसचं रब्बी हंगामातील पिकांसह प्रामुख्याने ऊस पिकात हुमणीचा प्रादुर्भाव अढळून येतो.या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच सामुदायिक उपाययोजना केल्यातर हुमणीचा प्रादुर्भाव रोखता येतो.

हुमणीच्या अंडी, अळी, कोष आणि भुंगेरे अशा चार अवस्था असतात. त्यात अळी अवस्था पिकांच्या मुळावर जगत असल्याने सर्वात नुकसानकारक असून, ती तीनवेळा कात टाकत मोठी होते. संपूर्ण जीवनक्रम वर्षभरात पूर्ण होत असला तरी त्यात अळी अवस्था ६ ते ८ महिने इतकी मोठी असते.

नियंत्रणाचे उपाय

हुमणीच्या जीवनक्रमात भुंगेरे हीच एक अवस्था थोड्या कालावधीसाठी जमिनीबाहेर असते. बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात. त्यामुळे या अवस्थेत किडीचा बंदोबस्त करण्यावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.

अ) भुंगेऱ्यांचा सामुदायिक बंदोबस्त

खरिप हंगामात पहिला पाऊस झाल्यावर हुमणीचे भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंब या झाडांवर पाने खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावीत. रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या केल्यास अंडी घालण्यापूर्वीच भुंगेऱ्यांचा नायनाट करणे शक्य होईल.

ब) हुमणी अळीचा बंदोबस्त

पीक काढणीनंतर लगेचच १५ ते २० सेंमी. खोल नांगरट करावी. नांगरणीवेळी उघड्या पडणाऱ्या अळ्या गोळा करुन रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून माराव्यात. आंतरमशागतीच्या वेळेस अळ्या गोळा करुन लोखंडी हुकच्या सहाय्याने किंवा खुरप्याने माराव्यात. पिकास पाणी देताना एखाद्या दिवशी पाणी जास्त काळ साचून ठेवल्यास अळ्या गुदमरून मरतील. हुमणीग्रस्त शेतातील कीडग्रस्त सुकलेली पिकांचे रोपे उपटावीत. मुळांशेजारील अळ्यांचा नाश करावा.

हुमणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिच्या नैसर्गिक शत्रू महत्वाचे आहेत.

पक्षी : बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इ. पक्षी त्यांचा फडशा पाडतात.

प्राणी : मांजर, रानडुक्कर, मुंगूस, कुत्रा इ. प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात.

जिवाणू (बॅसीलस पॉपीली) व सूत्रकृमी (हेटरो-हॅब्डेटीस) हे होलोट्रिकीया हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत.

ड्रेंचिंग करुन हुमणीचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण करता येतं. मेटारायझियम अॅनिसोप्ली हे बुरशीजन्य कीटकनाशक शिफारशीत प्रमाणात शेणखतातून जमिनीत मिसळून दिल्यास हुमनीचं चांगल्याप्रकारे नियंत्रण होऊ शकतं.

------------

स्त्रोत - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Insurance GR: फळपीक विम्याच्या 'आंबिया बहार'साठी १२९ कोटी निधी मंजूर, शासन निर्णय जारी

Heavy Rainfall: जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा

Public Issues: सामान्य जनतेची अडवणूक खपवून घेणार नाही: आमदार सुभाष देशमुख

Maharashtra Rain Forecast: कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Agrowon Podcast: गहू दरात चढ-उतार, सोयाबीन आवकेत वाढ, काकडी दर स्थिर, लिंबू दरात घसरण तर कोथिंबीर दरात बदल

SCROLL FOR NEXT