Fish Farming  Agrowon
ॲग्रो गाईड

Fish Farming : मस्त्यसंगोपन तलावाची पुर्वतयारी कशी करावी?

Fishing Pond : तलावातील मत्स्यपालनाचे यश हे हंगामपूर्व तयारीवर अवलंबून असते. ज्यांच्याकडे पूर्वीपासूनच मत्स्यतलाव/पाणी संचयन तलाव आहेत किंवा जे नवीन तलाव बनवून मत्स्यपालन करू इच्छित आहेत त्यांनी मत्स्यतलावांची पूर्वतयारी केल्यास उत्पादन आणि उत्पन्न वाढू शकते.

Team Agrowon

Fishery : तलावातील मत्स्यपालनाचे यश हे हंगामपूर्व तयारीवर अवलंबून असते. ज्यांच्याकडे पूर्वीपासूनच मत्स्यतलाव/पाणी संचयन तलाव आहेत किंवा जे नवीन तलाव बनवून मत्स्यपालन करू इच्छित आहेत त्यांनी मत्स्यतलावांची पूर्वतयारी केल्यास उत्पादन आणि उत्पन्न वाढू शकते.

तलावाचे वातावरण माशांच्या वाढीसाठी अनुकूल असावे. तलाव भक्षक, जलचर तण, तण मासे यापासून मुक्त असावा. माशांना पुरेसे नैसर्गिक अन्न उपलब्ध असावे.

प्री-स्टॉकिंग आणि पोस्ट-स्टॉकिंग व्यवस्थापनामध्ये समाविष्ट असलेल्या पायऱ्या नर्सरी, संगोपन आणि वाढीच्या तलावांमध्ये समान असतात. माशांचे संवर्धन सुरू होण्यापूर्वी तलावाची पुर्वतयारी करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. 

१) तलाव कोरडा करणे 

माशांचे संवर्धन सुरू होण्यापूर्वी कडक उन्हाळ्यात तलावातील पाणी काढून तलाव कोरडा केल्यास अतिनील सूर्यकिरणांमुळे सेंद्रिय पदार्थांचे निर्मूलन होते.

अमोनिया आणि हायड्रोजन सल्फाइडसारख्या विषारी वायूचे निर्जलीकरण होते. हे रोगकारक सूक्ष्म जीव नष्ट करते. भक्षक आणि तण मासे मरतात.

अवांछित जलीय वनस्पती मरतात. तलावातील मातीला जोपर्यंत तडे जात नाहीत तोपर्यंत तलाव १५ ते २० दिवसांपर्यंत उन्हात कोरडा ठेवावा.

२) तलाव नांगरणी 

लाकडी नांगर किंवा पॉवर टिलर किंवा ट्रॅक्टर वापरून तलाव नांगरणे आवश्यक आहे. नांगरणीमुळे माती मिसळली जाते, त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे निर्मूलन होण्यास मदत होते.

विषारी वायूंपासून मातीचे योग्य निर्जलीकरण होते. पोषक घटकांचे खनिजीकरण होते.

३) तलावात चुना मारणे

मत्स्य तलावात विशिष्ट प्रकारच्या चुन्याची मात्रेची परिणामकारकता आणि मातीचा सामू यावर अवलंबून असते. साधारणपणे २०० ते ५०० किलो/हेक्टर चुना तलावातील मातीसाठी केला जातो.

चुना वापरल्यानंतर हलकी नांगरणी करून वरच्या जमिनीत मिसळावा.

चुना मारल्यामुळे मातीचा सामू दुरुस्त होतो. सेंद्रिय पदार्थांचे खनिजीकरण होते. जमिनीची उत्पादकता वाढवून तलावाच्या तळाचे निर्जंतुकीकरण होते. 

४) पाणी भरणे 

मत्स्यशेती करिता वापरण्यात येणारे पाणी निर्जंतुक, स्वच्छ आणि मत्स्य व्यवसायास उपयुक्त व उत्पादक असावे. तलावातील पाणी नैसर्गिकरीत्या पावसाचे असल्यास निर्जंतुकीकरण करावे.

बाहेरील स्रोतांचे पाणी वापरत असल्यास वाळूचा फिल्टर किंवा विशिष्ट जाळे वापरून तलावात पाणी घ्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Protest : तात्काळ मदतीची मागणी! दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांचे उद्यापासून बेमुदत उपोषण

Soybean Seed Storage : सोयाबीन बियाणे सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Turmeric Crops : हळद उत्पादक शेतकरी हवालदिल! करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळद पीक आले अडचणीत

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

SCROLL FOR NEXT