Fish Farming : मत्स्यशेतीसाठी कोणत्या माश्यांची निवड करावी?

Team Agrowon

ग्राहकांची पसंती

मत्स्यपालनसाठी निवडलेल्या प्रजातींमध्ये काही आवश्यक गुण असावेत. जलद वाढीचा दर, अल्पावधीत मोठ्या आकारात वाढणाऱ्या मत्स्य जाती महत्त्वाच्या आहेत. जेव्हा एखादी प्रजाती मत्स्यपालनासाठी निवडली जाते. तेव्हा ग्राहकांची पसंती लक्षात घेणे आवश्यक आहे.

Fish Farming | Agrowon

उच्च उत्पादन दर

उच्च उत्पादन दर मिळविण्यासाठी, कृत्रिम खाद्य स्वीकारणाऱ्या माशांचे संगोपन करणे आवश्यक आहे. जेणे करून जास्तीत जास्त फायदा होईल. वातावरणातील अचानक बदल सहन करण्यास सक्षम असावी.

Fish Farming | Agrowon

अन्नाचा कार्यक्षम वापर

नैसर्गिक अन्नाचा कार्यक्षम वापर करण्यास सक्षम असावी. उच्च प्रजनन क्षमता असावी आणि बंदिस्त वातावरणामध्ये पुनरुत्पादन करणे सोपे असावे. मत्स्यपालन करताना तापमान, सामू, पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य असावे.

Fish Farming | Agrowon

पॉलिकल्चर

पाण्याच्या भौतिक, रासायनिक परिस्थितीतील चढ उतारांना अनुकूल प्रतिसाद दिला पाहिजे. रोग आणि परजीवींना प्रतिकारशक्ती चांगली असावी. इतर प्रजातींना त्रास न देता एकत्र राहण्याची गुणवत्ता विशेषतः पॉलिकल्चरमध्ये निवडलेल्या माशांमध्ये आवश्यक आहे. मांसाहारी माशांचे स्वतंत्रपणे संवर्धन करावे.

Fish Farming | Agrowon

भारतातील माशांच्या जाती

भारतात गोड्या पाण्यातील मत्स्यपालन आणि खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालन केले जाते. गोड्या पाण्यातील मत्स्यपालनामध्ये कार्प (आयमसी आणि सीमसी), कॅटफिश, गोड्या पाण्यातील कोळंबी इत्यादीचा समावेश केला जातो. मिश्रकल्चरमध्ये कटला, रोहू, मृगळ संवर्धन केले, तर तलावाचा परिपूर्ण फायदा होतो.

Fish Farming | Agrowon

चायनीज पॉलिकल्चर सिस्टम

आशियामध्ये कार्प कल्चरच्या दोन प्रमुख प्रणाली आहेत: चायनीज पॉलिकल्चर सिस्टम जेथे चिनी कार्प एकत्रितपणे संवर्धन केले जाते आणि भारतीय संमिश्र मत्स्यपालन प्रणाली जेथे भारतीय प्रमुख कार्प आणि चिनी कार्प एकत्र कल्चर केले जातात.

Fish Farming | Agrowon

चीनमधील पॉलिकल्चर प्रणाली

चीनमध्ये, सिल्व्हर कार्प, ग्रास कार्प, मड कार्प, ब्लॅक कार्प आणि कॉमन कार्प तलावांमध्ये पॉलिकल्चर प्रणाली अंतर्गत संवर्धन करतात.

Fish Farming | Agrowon

संमिश्र मत्स्यसंवर्धन

पाण्याचा निचरा न करता येणाऱ्या तलावांमध्ये संमिश्र मत्स्यसंवर्धनाच्या भारतीय प्रणाली अंतर्गत भारतीय कार्प, उदा. कटला, रोहू आणि मृगळ आणि चिनी कार्प्स, उदा. सिल्व्हर कार्प आणि ग्रास कार्प आणि कॉमन कार्प या माशांचे संवर्धन करतात. याचबरोबरीने मरळ, पंगस आणि गोड्या पाण्यातील कोळंबी या प्रजातीचे सुद्धा तलावात संवर्धन करतात.

Fish Farming | Agrowon
Apple | Agrowon