Rabi Onion Nursery Agrowon
ॲग्रो गाईड

Rabi onion- रब्बी कांदा रोपवाटिका कशी करावी?

महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. त्यासाठी रोपवाटिकेची तयारी ऑक्‍टोबर महिन्यात करतात. अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित जातींचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.

Team Agrowon

महाराष्ट्रात रब्बी कांदा (Rabbi Onion) पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. त्यासाठी रोपवाटिकेची तयारी ऑक्‍टोबर महिन्यात करतात. अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित जातींचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. एक हेक्टर कांदा लागवडीसाठी (Onion Cultivation) साधारणपणे ५ गुंठे क्षेत्रावर कांदा रोपवाटिका तयार करावी. याशिवाय कांदा रोपवाटिका तयार करताना काय काळजी घ्यावी? याविषयी कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथील शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी दिलेली माहिती पाहुया... 

रोपवाटिका तयार करण्यापुर्वी चांगले कुजलेले अर्धा टन शेणखत जमिनीत मिसळावे. त्याबरोबर ४० किलो निंबोळी खत मिसळावे. 

रोपवाटिका तयार करण्यासाठी गादीवाफ्याचा वापर करावा. वाफे १० ते १५ सेंमी उंचीचे, १ मीटर लांब व रुंद वाफे तयार करावेत. 

कांदा बियाणे पेरण्यापूर्वी पेंडीमिथॅलीन या तणनाशकाची २ ते ३ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. 

बीज प्रक्रियेसाठी थायरम किंवा कार्बेंन्डाझिम या बुरशीनाशकाचा २ ते ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात वापर करावा. 

ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक २ लिटर प्रति एकर याप्रमाणे जमिनीत ओल असताना द्यावे. 

बियाणे पेरण्यापूर्वी ४ किलो नत्र, १ किलो स्फुरद व १ किलो पोटॅश बियाणे पेरण्याअगोदर जमिनीत टाकावे. 

रोपांची मर होत असेल तर मेटॅलॅक्झील किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी किंवा आळवणी करणे गरजेचे आहे.  

रोपवाटिकेत रोपांना पिळ पडणे किंवा रोपावरील करपा आढळून आल्यास कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति लिटर किंवा मँकोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आटून पालटून फवारावे. 

रोपांवर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसत असल्यास फिप्रोनील १ मिली किंवा प्रोफेनोफॉस १ मिली  प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

IMD Rain Predication : ऑगस्ट महिन्यात राज्यात कमी पाऊस होणार; हवामान विभागाचा अंदाज

Agrowon Podcast : सोयाबीनचे दर टिकून; आजचे ज्वारी बाजार, ज्वारी दर, बेदाणा भाव, ढोबळी मिरची रेट

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार अभियानातील ९५ कामांची प्रशासकीय मान्यता प्रलंबित

Automation In Farming: खते, पाणी बचतीसाठी ऑटोमेशनवर भर 

Nagpur Heavy Rain: नागपुरात अतिवृष्टीमुळे ७,४३० हेक्टरवर नुकसान

SCROLL FOR NEXT