पपई (Papaya) ही आरोग्यास पोषक असून, त्यापासून जाम, जेली, केक, टुटी-फ्रुटी (Tutti fruiti ), सरबत, मार्मालेड, पेपेन बनवता येतात. महाराष्ट्रासह, तमिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, बिहार, व मध्य प्रदेश या राज्यामध्ये पपईची व्यापारी तत्त्वावर लागवड केली जाते. पपई या पिकातून कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळू शकते. टुटीफ्रुटी चा वापर केक (Cake) आणि इतर बेकरी पदार्थात (Bakery Products) होतो. त्यामुळे टुटीफ्रुटीला या उद्योगात चांगली मागणी आहे. कच्च्या पपईपासून टुटीफ्रुटी पुढीलप्रमाणे तयार करावी.
१ किलो कच्या पपईच्या गराचे चौकोणी टुकडे कापून घ्यावेत.
अर्धा लिटर पाण्यामध्ये ४ टी स्पून चुना मिसळून त्यामध्ये पपईचे तुकडे अर्धा तास ठेवावे.
तुकडे दुस-या पाण्यात २ ते ३ वेळा धुवून पांढ-या मलमलच्या कापडात बांधून ३ ते ५ मिनिटे वाफवून घ्यावे. त्यानंतर थोडावेळ थंड पाण्यात ठेवावे.
एक किलो साखरेचा एकतारी पाक करून गाळून घ्यावा व त्यामध्ये हे तुकडे पूर्ण एक दिवस ठेवावे.
तुकडे वेगळे करून पाक दोनतारी होईपर्यंत उकळावा व उकळताना त्यामध्ये सायट्रिक अॅसिड मिसळावे.
पाक गाळून घेऊन थोडा थंड झाल्यावर त्यामध्ये तुकडे व आवडीनुसार रंग घालुन मिसळावे व हे मिश्रण २ ते ३ दिवस ठेवावे.
तुकड्यांमध्ये पाक चांगला शिरल्यावर ते तुकडे बाहेर काढून वाळवावेत. तयार झालेली टुटीफ्रुटी बरणीत भरुन ठेवावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.