Crop Protection
Crop Protection Agrowon
ॲग्रो गाईड

कसे कराल आपत्कालिन पीक नियोजन?

टीम ॲग्रोवन

राज्यात जून महिन्यात पावसाने (Rain) ओढ दिली. त्यामुळे खरीपातील पेरण्या (Kharif Sowing) रेंगाळल्या. काही भागात दुबार पेरणीचे (Re Sowing) संकट ओढवले. त्यानंतरच्या काळात सर्वत्र जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. काही ठिकाणच्या पिकांना अतिवृष्टीचा (Crop Hit By Heavy Rain) फटका बसला. तर काही भागात वेळेवर पेरणीयोग्य पाऊस झालाच नाही. त्यामुळे अशा ठिकाणी बऱ्याच प्रमाणात खरीप पिकांची मोड झाली.

मोड झालेल्या नापेर क्षेत्रात आपत्कालिन पीक नियोजन (Crop Planning) महत्त्वाचे आहे. त्यानुसार पिकांमध्ये व पीक पद्धतीत बदल करावा लागेल. आपत्कालिन पीक नियोजनासंबंधी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पुढील सल्ला दिला आहेः

- जुलै महिन्यात सूर्यफुलाची पेरणी शक्य झाली नसल्यास ऑगस्ट महिन्याअखेर आपत्कालिन परिस्थितीत या पिकाची पेरणी फायदेशीर ठरू शकते. सूर्यफुलाचे संकरित वाण पीकेव्हीएसएच - २७, पीकेव्हीएसएफ - ९ , संकरित केबीएसएच - १, पीएएस - ८२ तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या इतर दर्जेदार वाणांची निवड करावी. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक पेरणीच्या वेळी शेतातच ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. सूर्यफुलाची पेरणी सरत्याने किंवा टोकून दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी किंवा ६० सेंमी व झाडातील अंतर ३० सेंटिमीटर ठेवून करावी.

शिफारस केलेल्या खत मात्रेपैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी देऊन उरलेल्या नत्राची मात्रा पेरणीपासून ३० ते ३५ दिवसांनी द्यावी.

- जुलै -ऑगस्ट महिन्यात अर्ध रब्बी तुरीची लागवड करणे हा सुद्धा एक पर्याय फायदेशीर आहे. अर्ध रब्बी तुरीची लागवड करायची झाल्यास मध्यम ते उशिरा कालावधीचे वाण उदा. एकेटी ८८११, पीकेव्ही तारा, सी ११, आयसीपीएल ८७११९ वापरावे. या वाणांचे प्रति हेक्टरी २५ ते ३० किलो बियाणे घेऊन ४५ बाय २० सेंमी अंतरावर पेरणी करावी. जसजसा पेरणीला उशीर होईल त्या प्रमाणात दोन ओळीतील व दोन झाडांतील अंतर कमी करावे. कारण उशिरा पेरणी केली असता वाढ कमी होते.

- अर्ध रब्बी तिळाची लागवड १ ते १५ सप्टेंबर पर्यंत करावी. एन - ८ या जातीचे हेक्टरी दोन किलो बियाणे तिफणीने ३० सेंमी अंतरावर पेरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम, कॅप्टन पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची चार ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. पेरणी सोबत ३० किलो युरिया व १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट ही रासायनिक खते द्यावीत.

- एरंडी या पिकाची सुद्धा अर्ध रब्बी हंगामात ऑगस्ट महिन्याअखेर तसेच सप्टेंबरच्या सुरुवातीला पेरणी करावी. लगेच एरंडी + तूर १:१ ही आंतरपीकपद्धती अधिक फायदेशीर ठरू शकते.

- जून जुलै महिन्यात पेरलेल्या पिकात खाडे भरायचे असल्यास तूर, सूर्यफूल किंवा तीळ या पिकांचे भरावे.

- फुलशेतीमध्ये मोगरा व ग्लॅडीओलस सारख्या फुलझाडांची लागवड करावी.

- अश्वगंधा, सोनामुखी, शतावरी या औषधी वनस्पतींची लागवड या महिन्यात करावी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT