pest infestation on mango  Agrowon
ॲग्रो गाईड

Mango Pest : या पद्धतीने करा आंब्यावरील तुडतूड्यांचे नियंत्रण

राज्यातील ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे आर्द्रतेत वाढ झालेली आहे. आंबा बागेत सध्या मोहोर अवस्था सुरु आहे. आंबा बागेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे आंब्याच्या मोहरावर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊन मोहराचे आणि झाडाचे नुकसान होते.

Team Agrowon

राज्यातील ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे आर्द्रतेत वाढ झालेली आहे. आंबा बागेत सध्या मोहोर अवस्था सुरु आहे. आंबा बागेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे आंब्याच्या मोहरावर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊन मोहराचे आणि झाडाचे नुकसान होते. पर्यायाने आंबा फळ उत्पादनात घट होऊन आर्थिक नुकसान होते. आंबा पिकावर जवळपास वेगवेगळया १८५ किडी आढळून येतात. त्यापैकी १०-१२ किडी जास्त नुकसानकारक आहेत, यामध्ये तुडतूडे, पिठ्या ढेकुन, खोडकीडा, शेंडा पोखरणारी अळी, फळमाशी, कोयीतील भुंगा, मिजमाशी, तांबडा कोळी, फुलकीडे, फळे पोखरणारी अळी, खवलेकिड, पानांची जाळी करणारी अळी या किडींचा उपद्रव होतो. सद्य स्थितित पावसाळी वातावरण असल्याने आणि बहर बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु असल्याने आंबा बागेत तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तुडतुड्यांच  नियंत्रण कसं करायचं याविषयी मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिलेली माहिती पाहुया.  

पाचरीच्या आकाराचे दिसणारे, ४ मिलीमीटर लांबीचे तुडतूडे अतिशय चपळ असतात. यांचा रंग आंबा खोडाच्या रंगाशी मिळताजुळता असून डोक्यावर तपकिरी ठिपके असतात. या किडीची मादी हिवाळ्यात फुले व कोवळी पाने यांच्या शिरात, देठात अंडी घालतात. यातून ५-६ दिवसात पिवळसर, काळपट पिले बाहेर पडून कोवळ्या पानातील आणि मोहरातील रस शोषण करतात.यामुळे पाने वेडी वाकडी होतात. ही किड आपल्या शरीरातू चिकट पदार्थ बाहेर टाकते, हा पदार्थ पानावर, लहान फळावर पडून  तेथे कॅपनोडीयम या काळपट बुरशीची वाढ होऊन झाडाची अन्ननिर्मिती प्रक्रिया मंदावते. झाडावर मोहर यायला लागल्यावर तुडतूडे गंभीर परिणाम करतात. 

तुडतुड्यांच नियंत्रण कसं करायचं?

या किडीच्या नियंत्रणासाठी अंब्याच्या झाडाच्या खोड, पाने आणि फांद्यावर बुप्रोफेझिन २५ टक्के ईसी २० मिली किवा ऑक्सिडिमेटॉन मिथाईल २५ टक्के ईसी १० मिली किवा थायोमिथॉक्झाम २५ टक्के डब्लूजी १ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. बागेचे नियमित सर्वेक्षण करुन प्रति मोहर सरासरी ५ पिल्ले दिसताच फवारणी हाती घ्यावी. मोहरावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कमी असल्यास निबीसीईडीन २० मिली प्रति १० लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. बागेत सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील याची काळजी घेतल्यास तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कमी होतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Crop Protection: द्राक्ष पीक वाचविण्यासाठी खर्चात चौपट वाढ

Ginning Pressing Industry: जिनिंग प्रेसिंग कारखाने दीपोत्सवानंतर धडाडणार

Raisin Market: झीरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद

Farmer Relief Package: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाची अंदाज कायम

SCROLL FOR NEXT