Healthy Rajgira
Healthy Rajgira Agrowon
ॲग्रो गाईड

Healthy Rajgira : आरोग्यदायी राजगिरा, भगर, राळा

Team Agrowon

डॉ. प्रणिता कडू

राजगिरा

पोषणतत्त्वे ः स्निग्ध पदार्थ, प्रथिने, खनिजे, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ,तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व अ, बी ५, जीवनसत्त्व ई आणि फॉलीक ॲसिड

उपयुक्तता ः

१. कॅल्शिअम भरपूर असते. तसेच लायसीन हे कॅल्शिअम शोषणास मदत करणारे जीवनसत्त्व असल्याने हाडांची मजबुती राखते.

२. जीवनसत्त्व क भरपूर मात्रेत असल्याने त्वचा, केसासाठी उपयुक्त आहे. हिरड्यांच्या विकारात उपयुक्त ठरते.

३) इश्यूलिनवर नियंत्रण राखण्याचा विशेष गुणधर्म आढळतो. त्यामुळे मधुमेहींसाठी फायदेशीर ठरते.

४) ग्लूटेन मुक्त आहे तसेच तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात असल्याने वजन कमी करताना उपयुक्त ठरतो.

५) मॅग्नेशिअम अधिक असल्याने डोकेदुखी नियंत्रणास उपयुक्त ठरते.

६) तंतुमय पदार्थ असल्यामुळे रक्तवाहिन्यातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते व हृदयाचे स्वास्थ राखते.

पदार्थ ः

उपवासाचे गोड बिस्कीट-

साहित्य ः राजगिरा पीठ १२० ग्रॅम, लोणी ५५ ग्रॅम, साखर ५६ ग्रॅम, बेकिंग पावडर ०.२५ ग्रॅम, दूध ३० मिलि.

कृती :

१. राजगिऱ्याच्या पिठामध्ये बेकिंग पावडर टाकून चाळून घ्यावे.

२. एका परातीमध्ये तूप घेऊन ते व्यवस्थित फेटून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये पिठी साखर, इसेंस, दूध मिसळून एकत्रित मळून घ्यावे.

३. तुपाचा हात लावून मैदा पसरून घ्यावा. त्यावर बिस्किटे तयार करून ठेवावीत.

४. ट्रे ओव्हनमध्ये ठेवून ३७५ अंश फॅरानाईट तापमानावर १५ मिनिटे भाजून घ्यावीत.

भगर/ सावा ः

पोषणतत्त्वे ः प्रथिने,खनिजे, कॅल्शिअम, फॉस्फरस, झिंक, पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ, लोह.

उपयुक्तता ः

१. लोह भरपूर असल्याने महिलांच्या गर्भावस्थेमध्ये रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी उपयुक्त.

२. पित्ताशय, किडनी व यकृतातील विषाक्त पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी उपयुक्त.

३. कावीळ व पोटाच्या संसर्ग, हेपीटाईटीस ए, बी, सी यांना दूर करण्यासाठी फायदेशीर.

४. ‍मुतखडा आजारावर नियंत्रण ठेऊन संरक्षण करते.

५. मधुमेह, कर्करोग, लठ्ठपणा व हृदयरोगापासून दूर ठेवते.

६. पोट साफ न होणे यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपयुक्त.

७. सांधेदुखी तसेच संधीवातासारख्या व्याधींवर उपचारात्मक आहार.

पदार्थ ः उपमा

घटक ः भगर, तेल/तूप, जिरे, मोहरी, हिरवी मिरची, पाणी

कृती ः

१. भगर पीठ तेल किंवा तुपामध्ये खमंग होईपर्यंत भाजून घ्यावे.

२. कढईत तेल किंवा तूप घेऊन त्यात जिरे, हिरवी मिरची यांची फोडणी देऊन त्यामध्ये भाजलेले भगरपीठ परतून घ्यावे. त्यात गरम केलेले पाणी गरजेनुसार मिसळून झाकण ठेऊन मंद आचेवर वाफ घ्यावी.

उत्ताप्पा

साहित्य ः भगर १ कप,अर्धा कप शेंगदाणा कूट, उकडलेले बटाटे, मिरची २, मीठ, पाणी.

कृती ः

१. भगर ४ तास भिजवून ठेवावी.

२. त्यानंतर पाण्यातून उपसून घ्यावी. उकडलेला बटाटा मिसळून मिक्सरमधून फिरवून घ्यावे.

३. मिश्रणामध्ये शेंगदाणा कूट, मिरची, मीठ, घालून मिश्रण एकत्र करावे.

४. तव्यावर थोडे तेल घालून मिश्रण डोश्याप्रमाणे पसरावे. आवडत असल्यास रताळ्याचा किस आवडीप्रमाणे घालावा.

५. दोन्‍हीकडून कुरकुरीत भाजून पुदिना खोबरे चटणी सोबत वाढावे.

राळा

पोषणतत्त्वे ः प्रथिने,खनिजे, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ

उपयुक्तता ः

१. लहान मुले व गर्भवती महिलांच्या शारीरीक विकासा करिता अतिशय पौष्टिक आहार.

२. पचनासाठी सुलभ असल्याने पोटदुखीसारख्या आजारांवर कायमस्वरूपी नियंत्रण.

३. मुत्रमार्गात होणाऱ्या जळजळसारख्या संसर्गावर नियंत्रणास उपयुक्त.

४. अतिसारावर त्वरित नियंत्रणासाठी लाभदायक.

५. भरपूर तंतुमय पदार्थ असल्याने बध्दकोष्ठतेच्या नियंत्रणासाठी उपयुक्त.

६. सांधेदुखी तसेच संधीवातासारख्या व्याधींवर उपचारात्मक आहार.

७. प्रथिने व लोहाच्या मुबलकप्रमाणामुळे रक्तक्षय दूर होण्यासाठी उपयोगी.

८. तंतुमय पदार्थ अधिक असल्याने वजनवाढीवर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त.

खीर ः

घटक ः एक वाटी राळा, साखर/ गूळ पाऊण वाटी, नारळाचे दूध चवीनुसार, जायफळ,

वेलची पुड चवीनुसार, काजू, बदाम.

कृतीः

१. राळा एक तास भिजत घालावा.

२. शिजताना थोडे (दोन चमचे) तूप टाकावे.

३. कुकरला चार शिट्या घेऊन राळा मऊ शिजवून घ्यावा.

४. मऊ शिजल्यानंतर साखर, गूळ, नारळाचा खव किंवा दूध घालून पुन्हा १० मिनिटे उकळू द्यावे. उकळताना काजू, बदामाचे काप मिसळावेत.

५. वेलची, जायफळची पूड टाकून गॅस बंद करावा.

अप्पे ः

घटक ः राळा पीठ २ वाट्या, उडीद डाळ १ वाटी, मिक्स डाळ (हरभरा, तूर) १ वाटी, मेथी दाणे

अर्धा चमचा आले लसूण पेस्ट, मिरची, जिरे, मोहरी, हिंग, तेल,दुधीभोपळ्याचा किस.

कृतीः

१. राळा पीठ, उडीद डाळ, मिक्स डाळ, मेथी, दाणे, स्वच्छ धुवून वेगवेगळे भिजत घालावे. आठ तासानंतर वेगळे वेगळे वाटून मिक्स करून ठेवावे. दहा तासांसाठी झाकून ठेवल्यावर मिश्रण फुलून येते.

२. दहा तासांनी मिश्रण फुलून आल्यावर त्यामध्ये आले- लसूण पेस्ट मिसळावी. चार मिरच्यांचे वाटण घालावे. चवीनुसार मीठ घालावे. १ चमचा तेल टाकून मिश्रण चांगले मिसळावे. इडलीच्या पीठासारखे करावे. त्यात एक वाटी दुधी भोपळ्याचा कीस टाकून मिसळावे.

३. खोल तवा किंवा कढईमध्ये एक छोटा चमचा तेल टाकून त्यात तीळ, हिंगाची फोडणी घालून झाकण ठेवून वाफ द्यावी. पाच मिनिटांनी झाकण काढून अप्पे उलटून घ्यावेत. झाकण ठेवू नये.

४. अप्पे करण्यासाठी वरील मिश्रण अप्पे पात्रात तेल सोडून अर्धा तास झाकण ठेऊन वाफवून घ्यावेत. सात मिनिटांनी शेकून घ्यावे. त्यानंतर अप्पे तयार होतात.

संपर्क - डॉ.प्रणिता कडू, ८६०५३०८९१३, (कृषी विज्ञान केंद्र, अमरावती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT