Fertilizer Agrowon
ॲग्रो गाईड

Fertilizer Use : खतांची कार्यक्षमता अन अन्नद्रव्यांची उपलब्धता

Fertilizers : खतांची कार्यक्षमता व अन्नद्रव्यांची उपलब्धता ही माती आणि पाण्याचा सामू, माती आणि पाण्यातील कॅल्शिअम कार्बोनेटचे प्रमाण, सुसंगतता, क्षारता निर्देशांक, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण, विद्राव्यता आणि हानिकारक घटकांची उपलब्धता यावर अवलंबून असते.

Team Agrowon

संजय बिरादार
Fertilizer Efficiency : खत वापरामध्ये नत्र: स्फुरद: पोटॅश यांचे गुणोत्तर ४:२:१ असणे आवश्यक आहे. हेच गुणोत्तर राजस्थानमध्ये ३०.३:१२.८:१ तर केरळ मध्ये १.४:०.६:१ दिसते.
खतांची कार्यक्षमता व अन्नद्रव्यांची उपलब्धता ही माती आणि पाण्याचा सामू, माती आणि पाण्यातील कॅल्शिअम कार्बोनेटचे प्रमाण, सुसंगतता, क्षारता निर्देशांक, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण, विद्राव्यता आणि हानिकारक घटकांची उपलब्धता यावर अवलंबून असते.

माती आणि पाण्याचा सामू:
सामू---पिकांची वाढ
>८.३---अति जास्त अल्कलाईन, अन्नद्रव्यांची उपलब्धता अत्यंत कमी
७.५ - ८.३ ---फेरसची व इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता होत नाही (मॉलिब्डेनम वगळता)
६.० - ७.२ ---बहुतांश पिकांसाठी योग्य
५.५ - ६.० ---बहुतांश अन्नद्रव्यांची उपलब्धता
४.६ - ५.५ ---जिवाणूंची कार्यक्षमता कमी
>४.६---बहुतांश पिकांसाठी ॲसिडिक/ आम्लीय

१) सर्वसाधारणपणे पश्चिम विभागातील जमिनीचा आणि पाण्याचा सामू हा ७.५ ते ८.५ म्हणजेच अल्कलाईन आढळून येतो. अशा जमिनीमध्ये खतांची कार्यक्षमता आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवायची असल्यास खतांचा सामू हा अत्यंत कमी (ॲसिडिक) किंवा न्यूट्रल असणे आवश्यक असते. फर्टीगेशन किंवा फवारणीद्वारे द्यावयाच्या खतांच्या द्रावणाचा सामू हा सरासरी ५.५ ठेवल्यास खतांची कार्यक्षमता आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता जास्त होते.
२) अल्कलाईन सामू असणाऱ्या जमिनीमध्ये स्फुरद हा कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सोबत त्वरित संयुग पावतो. ॲसिडिक सामू असणाऱ्या जमिनीमध्ये स्फुरद हा ॲल्युमिनिअम आणि फेरस सोबत संयुग पावतो.
३) जेव्हा सामू ७.५ च्या वर जातो तेव्हा प्रामुख्याने सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता अत्यंत कमी होते. ६.५ ते ६.८ सामू असताना सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता सहजतेने होते. अपवाद फक्त मॉलिब्डेनम आहे, जो ॲसिडिक जमिनीत अत्यंत कमी उपलब्ध होतो तर अल्कलाईन जमिनीत उपलब्धता वाढते.

माती आणि पाण्यातील कॅल्शिअम कार्बोनेटचे प्रमाण १) सर्वसाधारणपणे मातीमधील मुक्त चुन्याचे प्रमाण आणि पाण्यातील कॅल्शिअम कार्बोनेटचे प्रमाण यामुळे माती आणि पाण्यातील कॅल्शिअमचे संयुग हे स्फुरदासोबत होऊन कॅल्शिअम फॉस्फरस तयार होतो. याचाच अर्थ कॅल्शिअम आणि स्फुरदाची उपलब्धता होत नाही. २) स्फुरदाची उपलब्धता कमी झाल्यामुळे कार्यक्षम मुळांची वाढ कमी होते. कॅल्शिअममुळे या मुळांवर तयार होणारी रूट कॅप तयार होत असताना दिसून येत नाही. पर्यायाने पाणी व अन्नद्रव्यांचे शोषण हे मुळांमार्फत कमी होते. त्याचा अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर परिणाम होतो. ३) खतांची कार्यक्षमता आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवायची झाल्यास कॅल्शिअम आणि स्फुरदाची सुसंगतता तपासून या खतांमधील स्फुरद वापर शक्यतो करावा. ४) मातीमध्ये जेवढे मुक्त चुन्याचे प्रमाण जास्त तेवढेच पाण्याचा सामू जास्त प्रमाणात आपणास आढळून येईल. ५) आजतागायत विविध यंत्रणा कॅल्शिअमची शिफारस करताना दिसून येत नाहीत पण कॅल्शिअमच्या उपलब्धतेच्यादृष्टीने आपणास खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सुसंगतता ः १) अन्नद्रव्यांच्या विविध सुसंगततेचा विचार खत वापरापूर्वी किंवा एकमेकांमध्ये मिसळण्यापूर्वीकरणे आवश्यक आहे. २) सुसंगतता तपासून पाहावयाची झाल्यास काचेच्या जारमध्ये पाणी आणि खतांचे मिश्रण केले असता द्रावण जर स्वच्छ दिसत असेल तर खतांचा वापर आपण करावा. जर द्रावण गढूळ दिसत असेल तर त्या खतांचा वापर करू नये. कॅल्शिअम नायट्रेट + सल्फेट = कॅल्शिअम सल्फेट कॅल्शिअम नायट्रेट + फॉस्फेट = कॅल्शिअम फॉस्फेट मॅग्नेशिअम + डीएपी = मॅग्नेशिअम फॉस्फेट अमोनिअम सल्फेट + एमओपी = पोटॅशिअम सल्फेट फॉस्फरस + फेरस = फेरस फॉस्फेट ज्या ठिकाणी कॅल्शिअम > ६० पीपीएम, मॅग्नेशिअम > ३० पीपीएम आणि बायोकार्बोनेट्स > १५० पीपीएम असेल त्या ठिकाणी कॅल्शिअम कार्बोनेट्स आणि सामू वाढताना आपणास दिसून येतो. ४. क्षारता निर्देशांक खतांचा क्षारता निर्देशांक हा खते दिल्यानंतर जमिनीत किती क्षार जमा होतात यावरून ठरवला जातो. विविध खतांचा क्षारता निर्देशांक खत---क्षारता निर्देशांक अमोनिअम ट्रायो सल्फेट ---९०.४ अमोनिअम नायट्रेट---१०४ अमोनिअम सल्फेट ---८८.३ युरिया ---७४.४ एमएपी ---२६.७ डी ए पी ----२९.२ एमकेपी ---८.४ एनओपी---६९.५ एमओपी ---११६.२ एसओपी---४२.६ १) पोटॅशिअम

क्लोराईडचा क्षारता निर्देशांक (११६.२) हा सर्वात जास्त आहे. नत्र आणि गंधक युक्त खतांचा सुद्धा क्षारता निर्देशांक जास्तीचा असतो. त्यामुळे ज्या खतांचा क्षारता निर्देशांक कमी असेल अशा खतांचा वापर प्रामुख्याने करावा. सेंद्रिय कर्ब प्रमाण ः सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे सर्व साधारणपणे एक पेक्षा जास्त असल्यास अन्नद्रव्यांची उपलब्धता ही चांगली होते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर आवश्यक आहे. विद्राव्यता ः खतांची विद्राव्यता ही पाण्याच्या २० अंश सेल्सिअस तापमानास तपासून पाहणे आवश्यक आहे. हानिकारक घटकांची उपलब्धता: तांबे, आर्सेनिक आणि सोडियम या सारख्या हानिकारक घटकांचे प्रमाण अत्यंत कमी असणे आवश्यक आहे.

(लेखक आयसीएल इंडिया कंपनीमध्ये चीफ ॲग्रोनॉमिस्ट म्हणून कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी १२ टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू

Natural Farming : नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास मंजुरी

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Sugarcane Harvesting Workers : ऊसतोडणी मजूर कारखान्यावर आल्याने परिसर गजबजला

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली

SCROLL FOR NEXT