Fertilizer Use : रासायनिक खतांची निवड कशी कराल?

Team Agrowon

साधारणतः स्फुरदयुक्त आणि पालाशयुक्त खते एकाच हप्त्यात पेरणीच्या वेळी आणि बियाण्यापासून पाच सेंमी खोल द्यावीत. 

Fertilizer Use | Agrowon

नत्रयुक्त खताची पूर्ण मात्रा एकाच हप्त्यात न देता पिकाच्या अवस्था लक्षात घेऊन दोन ते तीन हप्त्यात द्यावी. 

Fertilizer Use | Agrowon

नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नीम कोटेड युरिया, सल्फर कोटेड युरिया अशा आवरणयुक्त युरिया चा वापर करावा. 

Fertilizer Use | Agrowon

नत्र वाहून जाऊ नये म्हणून पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे. खते शक्यतो पेरणीच्या वेळी द्यावीत व मातीने झाकावीत पिकाच्या कालावधीप्रमाणे खताच्या मात्रा विभागून देणे फायदेशीर ठरते.

Fertilizer Use | Agrowon

चुनखडी असलेल्या जमिनीत अमोनियम सल्फेट किंवा युरिया जमिनीच्या पृष्ठभागावर दिल्यास बराच नत्र उडून जातो म्हणून ही खते जमिनीत मिसळून द्यावीत. 

Fertilizer Use | Agrowon

स्फुरदाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू (पीएसबी) खतांचा वापर करावा. 

Fertilizer Use | Agrowon
cta image | Agrowon
येथे क्लिक करा