interculture Operation in kharif crop? Agrowon
ॲग्रो गाईड

Kharif Crop Management : जमीन प्रकार, पावसानुसार पीक नियोजन

Crop Management : जमिनीचा प्रकार आणि त्यातील सध्याचा उपलब्ध ओलावा यानुसार पीक लागवडीचे नियोजन करावे. आंतरपीक पद्धतीवर भर द्यावा. संरक्षित पाण्याचे नियोजन करावे. फळबागेत आच्छादन करावे.

Team Agrowon

डॉ. सुनील गोरंटीवार
Kharif Crop : जमिनीचा प्रकार आणि त्यातील सध्याचा उपलब्ध ओलावा यानुसार पीक लागवडीचे नियोजन करावे. आंतरपीक पद्धतीवर भर द्यावा. संरक्षित पाण्याचे नियोजन करावे. फळबागेत आच्छादन करावे.

जमिनीची खोली कमी-अधिक असल्यामुळे ओलावा साठवून ठेवण्याची क्षमता कमी जास्त असते. निरनिराळ्या पिकांना कमी जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे पिकाचे नियोजन केल्यास अवर्षणवर्षी उत्पादनात स्थिरता आणण्यास मदत होईल.

आंतरपीक पद्धत
आंतरपीक पद्धतीमध्ये मुख्य पिकाची प्रतिहेक्टरी रोपांची संख्या कमी न करता पेरणी अंतरात बदल करून जास्तीचे आंतरपीक घेतले जाते. यामध्ये पिकांच्या वाढीच्या काळात परस्परांशी स्पर्धा न करता एकमेकांना पूरक ठरतील अशी पिके निवडलेली असतात.


दोन्ही पिकांच्या पक्वता कालावधी, वाढीचा प्रकार, मुळांची वाढ भिन्न प्रकारची असल्यामुळे पिकांच्या योग्य वाढीस जमिनीतील ओलावा आणि अन्नद्रव्यांची गरज योग्य प्रकारे भागविली जाते. पावसामध्ये खंड पडल्यास कमीत कमी एकतरी पीक निश्‍चित येते.
पाण्याचा कार्यक्षम वापर
पाण्याच्या कमतरतेनुसार पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर (ठिबक व तुषार सिंचन) पीकनिहाय वेगवेगळ्या स्वरूपात करावा. या पद्धतीद्वारे रासायनिक खते देणे शक्य असते. जमिनीतील क्षार मुळांच्या खाली जात असल्याने व मुळाभोवतीची माती संतृप्त असल्याने क्षारांचा उपद्रव कमी होतो. तणांचे प्रमाण, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.


तुषार सिंचनात क्षारयुक्त पाण्याचा वापर करणे शक्य असते, तुषार सिंचनानंतर पाऊस पडला तरी पिकांवर अनिष्ट परिणाम होत नाही. कमी वेळेमध्ये जास्त क्षेत्रावर सिंचन करता येते.
पीक अवशेषाद्वारे आच्छादनाचा वापर
बाष्पीभवनामुळे जमिनीतील सुमारे ७० टक्के ओल उडून जाते. ती थोपवून धरण्यासाठी शेतातील निरुपयोगी काडीकचरा, धसकटे, उसाचे पाचट, तूरकाट्या, ज्वारीची धसकटे, वाळलेले गवत इत्यादी उपलब्ध सेंद्रिय पीक अवशेषांचा वापर पीक उगवणीनंतर १५ दिवसांच्या आत पिकाच्या दोन ओळींत जमिनीवर हेक्टरी ५ टन आच्छादन पसरावे. फळबागेतही आच्छादन करावे.

परावर्तक / बाष्परोधकाचा वापर
अवर्षण प्रवण कालावधीत सूर्याच्या उष्णतेमुळे पिकाच्या अंतरंगातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असते. ते कमी करण्यासाठी केओलीन, पांढरा रंग अगर खडू पावडरचा ८ टक्के फवारा पानांवर दिल्यास सूर्यप्रकाश पानावरून परावर्तित होऊन पिकांच्या अंतरंगातून होणारी पाण्याची वाफ कमी करण्यास मदत होते. पर्यायी पाण्याची बचत होऊन अवर्षण कालावधीत ताण सहन  होतो.

जमिनीच्या खोलीनुसार पिकांचे नियोजन
जमिनीची खोली (सेंमी) उपलब्ध ओलावा (मिमी) कोणते पीक घ्यावे?
७.५ सें.मी. पेक्षा कमी १५-३० गवत, वनशेती, कोरडवाहू फळबाग.
१७.५ सें.मी. ते
२२.५ सें.मी. ३०-४० गवत, हुलगा, मटकी, एरंडी, वनशेती व फळबागा, बाजरी + हुलगा/ मटकी (२:१) आंतरपीक.
२२.५ सें.मी. ते
 ४५ सें.मी. ४०-६० सूर्यफूल, बाजरी, बाजरी + तूर (२:१), सूर्यफूल+तूर (२:१), तूर + गवार (१:२), एरंडी + गवार (१:२) आंतरपीक आणि एरंडी, दोडका मिश्रपीक.

पेरणीनंतर पडलेल्या पावसाचा खंड आणि उपाययोजना
पेरणीनंतर १५ ते २० दिवसांचा पावसामध्ये खंड असल्यास...

पीक पीक नियोजन जमिनीतील अन्नद्रव्य  आणि  ओलावा व्यवस्थापन
सोयाबीन उगवण कमी झाल्यास दुबार पेरणी, संरक्षित पाणी २ टक्के पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी खुरपणी, कोळपणी.
कापूस उगवण कमी झाल्यास दुबार पेरणी, संरक्षित पाणी खुरपणी, कोळपणी.
मका उगवण कमी झाल्यास दुबार पेरणी, संरक्षित पाणी खुरपणी, कोळपणी.
बाजरी उगवण कमी झाल्यास दुबार पेरणी, बाजरी ऐवजी सूर्यफूल किंवा हुलगा पीक घ्यावे विरळणी, खुरपणी, कोळपणी.
हुलगा उगवण कमी झाल्यास दुबार पेरणी, हुलगा ऐवजी बाजरी किंवा राळा पीक घ्यावे. विरळणी, खुरपणी, कोळपणी.
मटकी उगवण कमी झाल्यास दुबार पेरणी, मटकी ऐवजी राळा पीक घ्यावे. विरळणी, खुरपणी, कोळपणी.
सूर्यफूल उगवण कमी झाल्यास दुबार पेरणी, विरळणी व खुरपणी करावी. २१ दिवसांनंतर कोळपणी करावी.
तूर उगवण कमी झाल्यास दुबार पेरणी, विरळणी व खुरपणी करावी. २१ दिवसांनंतर कोळपणी करावी.
मूग उगवण कमी झाल्यास दुबार पेरणी,विरळणी व खुरपणी करावी. २१ दिवसानंतर कोळपणी करावी.
उडीद उगवण कमी झाल्यास दुबार पेरणी, विरळणी व खुरपणी करावी. २१ दिवसांनंतर कोळपणी करावी.


जुलैमधील दुसऱ्या पंधरवड्यातील नियोजन
अ) जमिनीचा प्रकार :
हलकी (खोली ३० सेंमीपर्यंत)
सामान्य पीक पद्धती पिकामध्ये करावयाचा बदल पीक नियोजन
बाजरी तूर + कोथिंबीर (१:२) पावसानंतर लगेच पेरणी करावी.
हुलगा तूर + कोथिंबीर (१:२), राळा पावसानंतर लगेच पेरणी करावी.
मटकी मटकी, बाजरी + तूर (२:१) राळा पावसानंतर लगेच पेरणी करावी.
टीप ः  तूर पिकामध्ये पेरणीनंतर ३० दिवसांनी जलसंधारणासाठी दोन ओळींमध्ये सरी काढावी.
ब) जमिनीचा प्रकार : मध्यम जमीन (खोली ३० ते ६० सेंमी)
सामान्य पीक पद्धती पिकामध्ये करावयाचा बदल पीक नियोजन
सूर्यफूल सूर्यफूल, तूर + गवार (१:२) (पुसा सदाबहार, पुसा नवबहार), सूर्यफूल+तूर (२:१) पेरणीनंतर ३० दिवसांच्या आत एक कोळपणी आणि खुरपणी करावी.  पेरणीनंतर ३० दिवसांनी एक सरीआड जलसंधारणासाठी सरी काढावी.
तूर तूर, सूर्यफूल, तूर + गवार (१:२) (पुसा सदाबहार, पुसा नवबहार) पेरणीनंतर ३० दिवसांच्या आत एक कोळपणी आणि खुरपणी करावी.  पेरणीनंतर ३० दिवसांनी एक सरीआड जलसंधारणासाठी सरी काढावी.
भात सामान्य जाती भात : निमगरवा-फुले समृद्धी, हळवा - फुले राधा, कर्जत १८४, कर्जत ७, आर २४ रहू पद्धतीचा अवलंब करावा.
बाजरी बाजरी बाजरी पिकास पेरणीच्या वेळी शिफारशीत नत्र व स्फुरद खताबरोबर २५ किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे.  पेरणीनंतर ३० दिवसांच्या आत एक कोळपणी आणि खुरपणी करावी किंवा ३. पेरणीनंतर ३० दिवसांनी एक सरीआड जलसंधारणासाठी सरी काढावी.
क) जमिनीचा प्रकार : खोल भारी जमीन (खोली ६० सेंमीपेक्षा जास्त)
सामान्य पीक पद्धती पिकामध्ये करावयाचा बदल आपत्कालीन पीक नियोजन  
सूर्यफूल सूर्यफूल,  तूर + गवार (१:२), सूर्यफूल + तूर (२:१) पेरणीनंतर ३० दिवसांच्या आत एक कोळपणी आणि खुरपणी करावी.  पेरणीनंतर ३० दिवसांनी एक सरीआड जलसंधारणासाठी सरी काढावी.

तूर तूर, तूर + कोथिंबीर (१:२), तूर + गवार (१:२) पेरणीनंतर ३० दिवसांच्या आत एक कोळपणी आणि खुरपणी करावी.  पेरणीनंतर ३० दिवसांनी एक सरीआड जलसंधारणासाठी सरी काढावी.
मूग तूर + शेपू (१:२) पेरणीनंतर ३० दिवसांच्या आत एक कोळपणी आणि खुरपणी करावी.  पेरणीनंतर ३० दिवसांनी एक सरीआड जलसंधारणासाठी सरी काढावी.
उडीद बाजरी + तूर (२:१) पेरणीनंतर ३० दिवसांच्या आत एक कोळपणी आणि खुरपणी करावी.  पेरणीनंतर ३० दिवसांनी एक सरीआड जलसंधारणासाठी सरी काढावी.
भात सामान्य जाती भात : निमगरवा-फुले समृद्धी, हळवा - फुले राधा, कर्जत १८४, कर्जत ७, आर २४ रहू पद्धतीचा अवलंब करावा.जमीन प्रकार, पावसानुसार पीक नियोजन
डॉ. सुनील गोरंटीवार
जमिनीचा प्रकार आणि त्यातील सध्याचा उपलब्ध ओलावा यानुसार पीक लागवडीचे नियोजन करावे. आंतरपीक पद्धतीवर भर द्यावा. संरक्षित पाण्याचे नियोजन करावे. फळबागेत आच्छादन करावे.
जमिनीची खोली कमी-अधिक असल्यामुळे ओलावा साठवून ठेवण्याची क्षमता कमी जास्त असते. निरनिराळ्या पिकांना कमी जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे पिकाचे नियोजन केल्यास अवर्षणवर्षी उत्पादनात स्थिरता आणण्यास मदत होईल.

०२४२६-२४३८६१
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT