Chana mar rog  Agrowon
ॲग्रो गाईड

Chana mar rog : हरभऱ्यावरील मर रोगासाठी करा हे उपाय

वातावरणातील बदल आणि बीज प्रकियेचा अभाव यामुळे सध्या हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Team Agrowon

वातावरणातील बदल आणि बीज प्रकियेचा अभाव यामुळे सध्या हरभरा पिकावर (Chana Crop) मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा बुरशीजन्य रोग (Fungal Disease) असून‘फ्युजेरियम ऑक्सिस्फोरम’या बुरशीमुळे होतो.  या रोगाची लक्षणे साधारणपणे पेरणीनंतर ३ ते ४ आठवड्यांनी दिसून येतात. पीक वाचविण्यासाठी मर रोगाची लक्षणे ओळखून वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असते. मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय आहेत? याविषयी डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे येथील हर्षवर्धन मारकड यांनी दिलेली माहिती पाहुया.

-मर रोगाची बुरशी बियाण्यातून अथवा जमिनीतून मुळाद्वारे रोपात प्रवेश करते आणि खोडाच्या आतील भागात वाढते परिणामी जमिनीतील पाणी आणि अन्नद्रव्यांचा पानाकडे होणारा पुरवठा बंद होतो व त्यामुळे सुरवातीला या रोगात कोवळी पाने व फांद्या सुकतात आणि शेवटी पूर्ण झाड वाळून  जाते.

-या रोगाचा प्रसार प्रामुख्याने जमीन आणि बियाद्वारे होतो. 

- प्रथम पाने पिवळसर होतात आणि सुकतात. मर रोगग्रस्त झाड शेवटी पूर्णपणे मरून जाते.

-रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास झाडांची संख्या कमी होऊ पीक विरळ होते. परिणामी उत्पादनात घट होते. 

उपाय काय करावेत?

- एकाच शेतात सतत हरभरा पीक घेणे टाळावे. 

- मर रोगग्रस्त जमिनीत हरभऱ्याचे पीक घेऊ नये.

- लागवडीपूर्वी ३ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रती किलो बियाण्यास पेरणीपुर्वी लावावे. नंतर ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.

- मर रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी. यामध्ये विराट, विशाल, विजय, आयसीसीव्ही- १०, फुले विक्रम, जाकी- ९२१८ , साकी- ९५१६ वाणांची निवड करावी.  

- रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून शेताबाहेर उपटून फेकून द्यावीत. 

- मर रोगाचा प्रादुर्भाव शेतात दिसताच जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माची आळवणी करावी किंवा शेणखतातून मातीत टाकावे. 

- रासायनिक पद्धतीने रोग नियंत्रण करताना कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची आळवणी करावी. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: ‘वैशाख वणव्या’पूर्वीच होरपळ

Unseasonal Rain Relief GR: अवकाळीग्रस्त ९ जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ५३ कोटी ७३ लाख मदत मंजूर

Cotton, Soybean Rate: हळदीच्या भावात सुधारणा होण्याचे संकेत आहेत का ?

Village Development: गावच्या विकास निधीसाठी आता ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अनिवार्य

Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे

SCROLL FOR NEXT