महिला सहजरीत्या स्वतःच्या शेतावर गांडूळ खताची निर्मिती करू शकतात.
महिला सहजरीत्या स्वतःच्या शेतावर गांडूळ खताची निर्मिती करू शकतात. 
ॲग्रो गाईड

गांडूळ खत निर्मिती उद्योग

दीप्ती पाटगावकर

गांडूळ खत उपलब्ध सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत मानले जाते. गांडूळ खत निर्मितीचे तंत्र सोपे असून, महिला सहजरीत्या हे तंत्रज्ञान आत्मसात करून शेतावर गांडूळ खताची निर्मिती करू शकतात.   गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती

  • ढीग/बिछाना पद्धत
  • खड्डा पद्धत
  • टाकी पद्धत
  • खड्डा भरण्याची पद्धत

  • गांडूळ खत तयार करण्यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
  • गांडुळांचे कडक उन्हापासून संरक्षण होण्यासाठी बिछान्यावर छप्पर घालावे. छप्पर सिमेंटच्या पत्र्याचे किंवा शेतीमध्ये उपलब्ध असलेल्या तुराट्या, ज्वारीचे ताटे, गवत, पाचट इत्यादी किंवा बांबू वापरून करता येईल.
  • छप्पर दोन्ही बाजूंना उताराचे असावे. जेणेकरून पावसाचे पाणी सहज निघून जाईल व दोन्ही बाजूंनी ऊन येणार नाही यासाठी छपराची मधील उंची २.५ मी. व बाजूची उंची १.५ मी. असावी. रुंदी ५ मी. व लांबी ३ मी. किंवा आवश्‍यकतेनुसार आणि सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्धतेप्रमाणे असावी.
  • जमिनीवर सर्वात खाली तळाला १५ सेमी जाडीचा सेंद्रिय पदार्थांचा (उदा. गव्हाचे काड, उसाचे पाचट, सोयाबीन-तूर, पालापाचोळा व शेतातील इतर वाया जाणारे सेंद्रिय पदार्थ इ.) थर द्यावा.
  • त्यावर अर्धवट कुजलेले शेणखत व माती ३ः१ प्रमाणात मिसळून त्याचा १५ सेमी जाडीचा थर द्यावा. (या थरामुळे उष्णता थांबवण्याचे काम करील.)
  • पाण्यामध्ये शेण कालवून त्याचा १० सेमी जाडीचा तिसरा थर द्यावा. शेणामुळे सेंद्रिय पदार्थ कुजण्याची प्रक्रिया सुरू होईल व ते गांडुळांस खाद्य म्हणून उपयोगात आणता येईल.
  • शेवटी बिछाण्यावर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन घालावे. हे आच्छादन १५ सेमीपेक्षा जास्त जाडीचे नसावे.
  • बिछाना पाण्याने ओला करावा.(आवश्‍यकतेप्रमाणे दररोज किंवा दिवसाआड बिछान्यावर पाणी शिंपडावे.)
  • बिछान्यातील उष्णता कमी झाल्यावर एक दोन आठवड्यांनी वरील सेंद्रिय पदार्थांचा थर बाजूला सारून कमीत कमी १००० प्रौढ गांडुळे सोडावीत.
  • गांडूळ बिछान्यात सोडल्यावर परत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे व बिछान्यास नियमित पाणी द्यावे.
  • गांडुळांच्या संख्येनुसार गांडूळ खत निर्मितीस दीड ते दोन महिने लागतात.
  • गांडूळ खत तयार करताना घ्यावयाची काळजी

  • बिछान्यावर पाणी टाकताना जास्त पाणी साचणार नाही व ओलावा ४० ते ५० टक्के राहील याची काळजी घ्यावी.
  • बिछान्यातील तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअसदरम्यान ठेवावे व त्यावर सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • गांडूळ खताच्या बेडजवळ वाळवी, बेडूक, साप, मुंग्या, गोम, उंदीर व कोंबड्या येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • गांडूळ खत काढण्याची पद्धत खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले असे समजावे. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे. वरचा थर थोडा कोरडा झाला की बिछान्यातील पूर्ण गांडूळ खत गांडुळांसकट बाहेर काढावे व त्यांचा बाहेर उन्हात ताडपत्रीवर किंवा गोणपाटावर शंकाकृती ढीग करावा. म्हणजे उन्हामुळे गांडुळे तळाला जातील. ढिगाच्या वरचे गांडूळ खत काढून घ्यावे. ३-४ तासात सर्व गांडुळे परत खत तयार करण्यासाठी बिछान्यात/खड्ड्यात सोडावीत. अशाच पद्धतीने खड्डा, कुंडी किंवा टाकी पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते.   दीप्ती पाटगावकर, pckvkmau@gmail.com (कृषी विज्ञान केंद्र, अाैरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT