लसूण घासामध्ये १९ ते २० टक्के प्रथिने असतात.
लसूण घासामध्ये १९ ते २० टक्के प्रथिने असतात. 
ॲग्रो गाईड

जनावरांसाठी उपयुक्त प्रथिनयुक्त द्विदल चारा पिके

डॉ. पवनकुमार देवकते, डॉ. प्रफुल्लकुमार पाटील

प्रथिने पुरवठा करणाऱ्या चारा पिकांमध्ये विशेषतः द्विदल चारा पिकांचा समावेश होतो. यामध्ये लसूणघास, बरसीम, चवळी इ. चारापिकांचा समावेश होतो. त्यांची लागवड पद्धत, कापणी, चारा उत्पादन याबद्दल माहिती असणे अावश्‍यक अाहे.   दुधाळ जनावरांपासून उत्तम प्रतीचे दूध मिळविण्यासाठी ऊर्जा, कर्बोदके, प्रथिने, क्षार, मीठ इ. घटकांचा आहारात समावेश करावा लागतो. विशेषतः प्रथिने पुरवठा करणाऱ्या घटकांमध्ये पेंडी/ ढेप हा मुख्य स्रोत म्हणून वापरला जातो. त्यामुळे आहारावरील व पशुखाद्यावरील खर्च वाढतो. आणि पर्यायाने पशुपालन व्यवसायातील नफा कमी होतो. दुधातील एस. एन. एफ. दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, वासरांची वाढ, करडांची जलद वाढ तसेच जनावर सशक्त राहण्यासाठी शरीराला प्रथिनांची गरज असते. ही प्रथिने जर चाऱ्यामार्फत दिली तर निश्‍चितच पशुखाद्यावरील खर्च कमी होण्यास मदत होईल व पशुपालन व्यवसाय किफायतशीर होईल. १) लसूणघास/ मेथीघास/ लुसर्न

  • लसूणघास लागवडीसाठी निचरा होणारी, २ ते ३ वेळा कुळवणी व नांगरट केलेली जमीन लागते.
  • वाफे पद्धतीने किंवा पाभरीने ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी.
  • बियाणांची ऑक्‍टोबर ते डिसेंबर या काळात पेरणी करावी.
  • यासाठी बियाणे २५ किलो लागते व खत नत्र १०० किलो, स्फुरद ५० किलो, पालाश ४० किलो द्यावा.
  • सुरवातीला एकवेळी खुरपणी करावी.
  • पाणी व्यवस्थापनामध्ये दुसरी व तिसरी पाळी ४ ते ५ दिवस अंतराने व नंतर १० ते १२ दिवस अंतराने पाणी द्यावे.
  • पहिली कापणी ६५ ते ७० दिवसांनी करावी, नंतर ५ ते ६ कापण्या पुढील ३० दिवसांत कराव्यात.
  • यापासून २००० ते २५०० क्विंटल/ हेक्‍टर उत्पादन मिळते.
  • महत्त्वाचे म्हणजे लसूण घासामध्ये १९ ते २० टक्के प्रथिने असतात.
  • २) बरसीम

  • बरसीमसाठी मध्यम ते भारी जमीन लागते.
  • जमीन नांगरट व २ ते ३ वेळा कुळवणी केलेली असावी.
  • ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर दरम्यान पेरणी करावी.
  • धारवाड, मेस्कोनी, झासी असे सुधारित वाण वापरावेत.
  • पाभरीने २५ ते ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी.
  • हेक्‍टरी ३० किलो बियाणे लागते. नत्र १०० किलो, स्फुरद ५० किलो, पालाश ४० किलो खताची मात्रा लागते.
  • ६० ते ७० दिवसाने पहिली कापणी करावी व नंतरचा दर ३० दिवसांनी ५ ते ६ कापण्या कराव्यात.
  • ६०० ते ८०० क्विंटल प्रति हेक्‍टर उत्पादन मिळते.
  • बरसीम पासून १७ ते १८ टक्के प्रथिने व २५ ते २६ टक्के स्निग्ध पदार्थ मिळतात.
  • ३) चवळी

  • चवळी लागवडीसाठी भारी जमीन लागते.
  • जमीन २ ते ३ वेळा कुळवणी केलेली व नांगरलेली असावी.
  • जानेवारी ते ऑगस्ट या काळात दोन ओळीत ३० ते ४० सें.मी. अंतर ठेवून पेरणी करावी.
  • ई.सी. ४२१६, युपीसी ५२८६, एन.पी. ३ असे सुधारित वाण वापरावेत.
  • हेक्टरी ५० ते ५५ किलो बियाणे लागते. हेक्‍टरी नत्र २५ किलो स्फुरद ५० किलो लागते.
  • १ ते २ वेळा खुरपणी करावी.
  • १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • पहिली कापणी पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना करावी व नंतर ५५ ते ६० दिवसांनी कापणी करावी.
  • चवळीपासून हेक्टरी ३०० ते ३५० क्विंटल उत्पादन मिळते.
  • चवळीमध्ये महत्त्वाची पौष्टीक घटक असतात. यामध्ये प्रथिने १८ ते १९ टक्के स्निग्ध पदार्थ २५ ते २६ टक्के, कॅल्शियम १.४ टक्के आणि पूर्ण पचणीय पदार्थ ५८ ते ६० टक्के असतात.
  • प्रथिनयुक्त चारा देण्यामुळे होणारे फायदे

  • प्रथिनांचा पुरवठा चाऱ्यामार्फत झाल्यामुळे पशुखाद्यावरील खर्चात बचत होऊन नफा वाढतो.
  • दुधातील एस.एन.एफ. वाढण्यास मदत होते.
  • वासरांची/ करडांची वाढ जोमाने/ जलद होते.
  • गाभन जनावरांचे उत्तम पोषण होते.
  • जनावरांचे आरोग्य सुधारून रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
  • वासरे/ करडे यांचे जन्म वजन वाढण्यास मदत होते व वासरे सशक्त जन्मतात.
  • संपर्क : डॉ. पवनकुमार देवकते, ९९७०२८५५८५ डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३ (पशुवैद्यकीय व पशूविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT