अनेक प्रक्रिया पदार्थांमध्ये सीताफळ गर उपयुक्त
अनेक प्रक्रिया पदार्थांमध्ये सीताफळ गर उपयुक्त 
ॲग्रो गाईड

अनेक प्रक्रिया पदार्थांमध्ये सीताफळ गर उपयुक्त

माधुरी रेवणवार

सीताफळ हे नाशवंत फळ असल्यामुळे त्यावर प्रक्रिया करणे आणि गर टिकवून ठेवणे गरजेचे आहे. सीताफळ प्रक्रियेबद्दल म्हणावी तेवढी जागरुकता नाही. सीतापळावर प्रक्रिया करून चांगला लघुउद्याोग सुरू करून ग्रामीण भागातील महिला चांगला फायदा मिळवू शकतात. सीताफळामध्ये पाण्याचे अधिक प्रमाण असल्यामुळे हे फळ नाशवंत फळामध्ये येते. पूर्ण पिकलेले सीताफळ एक अथवा दोन दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. म्हणून सीताफळावर प्रक्रिया करून त्याचा गर काढून साठवून ठेवला तर तो वर्षभर वापरता येतो. यामुळे एक ते दोन महिना कालावधी असलेल्या या फळाचा आस्वाद पूर्ण वर्षभर हवा तेव्हा घेता येतो. जास्त प्रमाणात फळे उपलब्ध असतील किंवा विक्री अभावी वाया जाणार असतील किंवा खूप कमी भाव मिळत असेल तेव्हा प्रक्रिया करून सीताफळाचे मूल्यवर्धन होते.

सीताफळातील पोषक घटक

  • १०० ग्रॅम सीताफळामधील पोषणमूल्य
  • ऊर्जा ः १०४ किलो कॅलरी
  • प्रथिनेः १.६ ग्रॅम
  • कार्बोदके ः २३.५ ग्रॅम
  • तंतू ः ३.१ ग्रॅम
  • फॅट ः ०.४ ग्रॅम
  • खनिजे

  • कॅल्शिअम ः ९७ मि.ग्रॅम
  • फॉस्फरस ः ४७ मि. ग्रॅम
  • लोह ः ४.३१ मि. ग्रॅम
  • मॅग्नेशियम ः ८४ मि. ग्रॅम
  • जीवनसत्वे

  • जीवनसत्व क ः ३७ मि.ग्रॅम
  • नायसिन ः १.३ मि. ग्रॅम
  • रायबोल्फेविन ः ०.१७ मि. ग्रॅम
  • सीताफळ गर

  • पिकलेली आणि जास्त पाकळी युक्त सीताफळे निवडावीत.
  • सीताफळाचे दोन भाग करून आतील गर बियासहीत चमच्याने काढून घ्यावा.
  • बियांचा गर हाताने काढून वेगळा करावा. अथवा, सीताफळ गर काढण्याच्या मशिनद्वारे गर आणि बिया वेगळ्या कराव्या.
  • काढलेल्या एक किलो गरामध्ये एक ग्रॅम पोटॅशिअम मेटाबायसल्फाईड हा संरक्षक पदार्थ टाकून पॅकिंग करावी.
  • हा गर २० अंश सेल्सिअस तापमानाला साठवून ठेवावा.
  • चांगल्या दर्जाच्या फळापासून ३० ते ३५ ग्रॅम गर मिळतो.
  • सीताफळ गराचे पदार्थ सीताफळ गर वापरून मिल्क शेक, ज्यूस, बासुंदी, रबडी, आईस्क्रीम असे पदार्थ तयार करता येतात. तसेच गराला वाळवून सीताफळ पावडर; कस्टर्ड पावडरदेखील करता येतो. ज्याचा उपयोग फ्रूट कस्टर्ड, आइस्क्रीम आणि अनेक गोड पदार्थांमध्ये केला जातो. या पदार्थांमुळे बाजारामध्ये सीताफळ गराला सध्या चांगली मागणी आहे. सीताफळाच्या किमतीपेक्षा चार ते पाच पट जास्त उत्पादन मिळू शकते.   संपर्क ः माधुरी रेवणवार, ०२४६५-२२७७५७, ९४०३९६२०१४ (गृहविज्ञान तज्‍ज्ञ, कृषि विज्ञान केंद्र सगरोळी, ता. बिलोली जि. नांदेड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT