आंबा तुडतुडे
आंबा तुडतुडे  
ॲग्रो गाईड

आंबा पीक सल्ला

डॉ. भरत साळवी, महेश कुलकर्णी

आंबा पिकाचे वार्षिक चक्र काढणीनंतर म्हणजे जून महिन्यात  सुरू होते. यावेळी झाडाला सेंद्रिय तसेच रासायनिक खताच्या संतुलित मात्रा द्याव्यात. पावसाचे पाणी झाडाला मिळाले की पालवी येते. ही पालवी पावसातील उपलब्ध सूर्यप्रकाशात हळूहळू प्रकाशसंश्‍लेषण क्रिया करून पुढील हंगामासाठी ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये मोहर येण्यास तयार झालेली आढळते. त्यामुळे या हंगामात खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.

  • प्रकाश संश्‍लेषण क्रिया गतिमान होण्यासाठी फांद्यांची विरळणी करावी, सुकलेल्या तसेच रोगट फांद्या काढून टाकाव्यात. फांदीवर बुरशीजन्य रोग येऊ नये म्हणून १ टक्के बोर्डोमिश्रण किंवा कॉपर अाॅक्सी क्लोराईड २.५ ग्रॅम प्रती लिटर याप्रमाणे फवारणी पूर्ण झाडावर करावी.
  • बांडगुळे झाडावर दिसताच ती पूर्णपणे काढावीत. बांडगुळे मोठी असल्यास ती फांदीसकट कापून टाकावीत व कापलेल्या भागांवर बोर्डोपेस्ट (१० टक्के - १० किलो चुना अधिक १० किलो मोरचूद प्रति १०० लिटर) पाणी लावावी.
  • पावसाळा संपलेला असल्याने बागेची सफाई करणे आवश्‍यक आहे. झाडाच्या बुंध्यातील तण काढून टाकावे. खत दिलेल्या भागापासून ते खोडापर्यंतचा पट्टा तणमुक्त करावा. बागेत वाढलेले इतर तण मजुरांच्या उपलब्धतेनुसार ग्रासकटरच्या साहाय्याने काढून घ्यावे.
  • नवीन पालवी आली असल्यास तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे पालवी कमकुवत होते परिणामी मोहर लांबू शकतो. प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) (९ मिलि प्रती १० लिटर पाणी) याप्रमाणे फवारणी करावी.
  • समुद्रालगतच्या काही भागांमध्ये मोहर आलेला आढळतो पूर्ण मोहरलेल्या झाडावर ५० पीपीएम (५० मिलीग्रॅम प्रती लिटर) जीब्रेलीक ॲसीडची फवारणी करावी, त्यामुळे पुनमोहराची प्रक्रिया थांबते तसेच जिब्रेलिक ॲसिडची (५० पीपीएम) दुसरी फवारणी मोहरीच्या आकाराची फळे दिसू लागल्यावर करावी.
  • संपर्क : डॉ. भरत साळवी, ९४२३२९६००० (कृषी महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT