microscopic view of Escherzonia fungi stroma
microscopic view of Escherzonia fungi stroma 
ॲग्रो गाईड

काळ्या माशीवर वाढणारी उपयुक्त एस्चेर्सोनिया बुरशी

डॉ. योगेश इंगळे, डॉ. दिनेश पैठणकर

सध्यस्थितीत नागपूर व अमरावती परिसरातील बऱ्याच संत्रा बागेमध्ये पानांवर कोळशीसोबतच पांढरे डाग व त्यामध्ये नारंगी रंगाचे मध्यबिंदू असलेले ठिपके दिसून येत आहेत. अनेक संत्रा उत्पादक यास रोगाचा प्रादुर्भाव समजून फवारणी करत आहेत. मात्र, हे पानांवरील ठिपके हे रोग अथवा विकृती नसून एस्चेर्सोनिया ही मित्रबुरशी आहे. एखाद्या किडीचा अधिक प्रादुर्भाव किंवा उद्रेक झाल्यानंतर नैसर्गिक परिसंस्थेमध्ये किडीच्या नियंत्रणासाठी विविध घटक कार्यरत होतात. अशाच प्रकारे संत्रा पिकावरील हानिकारक कीड काळी माशीच्या बाल्य ते कोश अवस्थांवर ‘एस्चेर्सोनिया’ या बुरशीची वाढ झाली. आहे. या बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल हवामान असल्याने काळी माशीमध्ये संक्रमण होऊन त्यांना रोगग्रस्त केले आहे. संत्रा पानामागे काळ्या माशीची पिल्ले असंख्य प्रमाणात वसाहतीसारखी चिकटून असतात. त्यांच्यामध्ये या बुरशीचा प्रसार एखाद्या साथीप्रमाणे झाला आहे. त्यामुळे पानांवर रोगग्रस्त किडींवर एस्चेर्सोनिया बुरशीची बीजफळे विकसित झालेली दिसून येत आहेत. बुरशीची ओळख

  • एस्चेर्सोनिया या बुरशीच्या एस्चेर्सोनिया एलेरोडिस व एस्चेर्सोनिया प्लासेन्टा या मुख्य प्रजाती बहुतांश भागात आढळतात.
  • एस्चेर्सोनिया ही बुरशी कीटकांच्या एलेरोडाइडे या कुळातील कीटकांनाच आपले भक्ष्य बनविते. एलेरोडाइडे या जातकुळातील कीटक म्हणजे संत्र्यावरील काळी माशी, पांढरी माशी व खवले कीड होय.
  • बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल हवामान ः २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान, ७० टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता, पावसाची रिमझिम स्थिती आणि किडीची विपुल संख्या या अवस्थेत या बुरशीची वाढ झपाट्याने होते.
  • सदर बुरशीची वाढ ही विशिष्ट माध्यमावर करता येते. त्यामुळे एलेरोडाइडे कुळातील कीटकांच्या जैविक नियंत्रणासाठी या बुरशीचा वापर करता येतो.
  • बुरशीमुळे रोगग्रस्त झालेल्या किडींची लक्षणे

  • एस्चेर्सोनिया बुरशी काळ्या किंवा पांढऱ्या माशीच्या बाल्यावस्था ते कोष अवस्थेत संक्रमित करते. हवेत पसरलेले या बुरशीची बीजफळे किडीच्या शरीर पृष्ठभागावर चिकटून किडीच्या आतमध्ये प्रवेशनलिका (अप्रेसोरियम) सोडून शरीरात शिरते. कीटकाच्या संपूर्ण शरीरामध्ये तंतूचे (मायसेलीयम) जाळे झपाट्याने पसरवते. त्यातून मिळवलेल्या कीटकांच्या अंतर्गत पोषक घटकावर बुरशी जगते.
  • बुरशीची वाढ शरीरात होत असताना कीड अन्नरस शोषण करण्याचे थांबवते. निपचित होऊन पडून राहते. रोगग्रस्त होऊन मरते.
  • बुरशीचे पांढरे तंतू किडीच्या शरीराबाहेर बाजूच्या व वरच्या भागातून बाहेर पडतात. यावर बुरशीचे केशरी-नारंगी रंगाचे बीजफळ (स्ट्रोमा) तयार होते. यामध्ये असंख्य बीजफळे (स्पोअर्स) विकसित होतात. ती बीजफळातून फुटून हवेत मिसळतात. संपर्कात येणाऱ्या किडीच्या शरीरावर चिकटतात. त्या किडीच्या शरीरात शिरकाव करून रुजून पुन्हा अंकुरीत होतात. किडीमध्ये साथीच्या रोगाप्रमाणे वेगाने पसरतात.
  • रोगग्रस्त झालेल्या किडीवर नारंगी केशरी किंवा पिवळे रंगाचे ठिपके दिसतात.
  • संपर्क- डॉ. योगेश इंगळे, ९४२२७६६४३७ डॉ. दिनेश पैठणकर,९८८१०२१२२२ (अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT