New variety of sorghum for fodder 'CSV 40F'
New variety of sorghum for fodder 'CSV 40F' 
ॲग्रो गाईड

चाऱ्यासाठी ज्वारीचा नवा वाण ‘सीएसव्ही ४० एफ’

डॉ. के. आर. कांबळे, डॉ. आर. आर. धुतमल, डॉ. एल. एन. जावळे

चारा पीक म्हणून ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे. चाऱ्यासाठी उत्तम वाणांची आवश्यकता लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ज्वारी संशोधन केंद्रामध्ये `सीएसव्ही ४० एफ` हा ज्वारीचा वाण विकसित करण्यात आला आहे. संशोधित करण्यात आला. हा वाण चाऱ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यात लागवडीसाठी शिफारशीत आहे. सीएसव्ही ४० एफ या वाणाची वैशिष्ट्ये

  • वंशावळ पीव्हीके ८०९ व १०३७ आर यांच्या संकरातून वंशावळ पद्धतीने निवड
  • हिरवा चारा उत्पादन - हेक्टरी ४५ ते ४६ टन
  • वाळलेला चारा उत्पादन- हेक्टरी १४ ते १५ टन
  • खतांच्या वाढीव मात्रेस प्रतिसाद देणारा वाण
  • कडब्याची उत्तम प्रत, चांगली पचनक्षमता असलेला चारा
  • उंच वाढणारा (सरासरी उंची २४०-२५० सेंमी) हिरवीगार, लांब रुंद पाने, मध्यम गोड रसाळ धांडा
  • खोडमाशी, खोडकिडा व पानांवरील ठिपके यांस मध्यम सहनशील
  • कालावधी पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना म्हणजेच ८० ते ८५ व्या दिवशी हिरव्या चाऱ्याची कापणी करावी.
  • एक एकर पेरणीसाठी २५ सेंमी बाय ५ सेंमी अंतरावर पेरणी करण्यासाठी १२ किलो बियाणे लागते. हे बियाणे विद्यापीठाच्या बियाणे बीजप्रक्रिया केंद्रामध्ये उपलब्ध आहे.
  • सुधारित लागवड तंत्रज्ञान

  • जमीनः चारा ज्वारीच्या लागवडीसाठी मध्यम ते खोल उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीची योग्य मशागत करावी.
  • पाण्याचा निचरा होण्यासाठी दांड पाडून घ्यावेत.
  • बियाण्याचे प्रमाणः चारा ज्वारीच्या पेरणीकरिता हेक्टरी ३० किलो बियाणे वापरावे.
  • बीजप्रक्रिया पेरणीपूर्वी बियाण्यास अॅझोटोबॅक्टर २५ ग्रॅम, स्फुरद विरघळवणारे जिवाणू २० ग्रॅम, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात हलके चोळून घ्यावे. यामुळे बियाण्याची उगवणक्षमता वाढते. पुढील कालावधीत पीक जोमदार वाढते. पेरणीचा कालावधी सीएसव्ही ४० एफ हे खरीप ज्वारीचे सुधारित चारा वाण आहे. त्याची लागवडही खरीप ज्वारीप्रमाणेच जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. पेरणी उशिरा झाल्यास खोड माशीचा प्रादुर्भाव वाढतो.

    पेरणी या वाणाची पेरणी करताना दोन तासातील अंतर २५-३० सेंमी व दोन ताटातील अंतर अंदाजे ५ सेंमी इतके राहील अशा पद्धतीने तिफणीच्या साह्याने पेरणी करावी. दोन तासांतील तसेच दोन ताटांतील अंतर कमी ठेवल्यास ज्वारीचे धांड बारीक पडतात, त्यामुळे जनावरांना खाण्यास व चांगले पचन होण्यास मदत मिळते. खत व्यवस्थापन सीएसव्ही ४० एफ हे वाण नत्र, स्फुरद व पालाश यांना सकारात्मक प्रतिसाद देणारे आहे. सीएसव्ही ४० एफ या वाणास वाढीच्या योग्य अवस्थेत शिफारशीत प्रमाणात खतांचा वापर करावा. हिरवा व वाळलेल्या चाऱ्याच्या उत्पादनात भरघोस वाढ होत असल्याचे अखिल भारतीय ज्वारी सुधार कार्यक्रमाअंतर्गत घेतलेल्या प्रयोगात दिसून आले आहे. प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश या अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. ही खतांची मात्रा पिकाच्या वाढीच्या अवस्थेत दोनदा विभागून देण्यात यावी. पैकी पेरणी करताना नत्राची अर्धी (५० किलो/हेक्टर), स्फुरद व पालाश यांची संपूर्ण (५० किलो/हेक्टर) मात्रा द्यावी. उरलेली नत्राची अर्धी मात्रा (५० किलो/हेक्टर) पिकाच्या वाढीच्या अवस्थेत म्हणजेच पेरणीनंतर सुमारे ३० ते ४० दिवसांनी द्यावी. आंतरमशागत चारा ज्वारीची लागवड धान्य ज्वारीच्या तुलनेत फार दाट केली जाते. दोन ताटातील व दोन धांडातील अंतर इतर ज्वारीच्या तुलनेत कमी असते. पिकाच्या वाढीच्या अवस्थेत अंतर मशागत करणे शक्य होत नाही. अशा वेळी तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पीक एक महिन्याचे होईपर्यंत १ खुरपणी व १ ते २ कोळपण्या कराव्यात. पाणी व्यवस्थापन हा खरिपातील चारा पिकाचा वाण असून, अतिरिक्त पाण्याची सहसा गरज भासत नाही. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे जास्त दिवसांचा खंड पडल्यास किंवा पिकांत पाण्याच्या कमतरतेमुळे उद्भवणारी लक्षणे (उदा. पाने दुपारच्या उन्हात कोमेजून जाणे, काही प्रमाणात पाने गुंडाळली जाणे किंवा पाण्याच्या कडा करपणे) दिसून आल्यास पिकास पाणी द्यावे. उत्पादन चाऱ्यासाठी ज्वारी पिकाची काढणी ५० टक्के फुलोरा अवस्थेत किंवा पेरणीनंतर जास्तीत जास्त ८० ते ८५ दिवसांनी करावी. योग्य प्रकारे कीड व रोग नियंत्रण व सुधारित लागवड तंत्राचा वापर केल्यास साधारणपणे ४४ ते ४६ टन हिरवा चारा व १४ ते १५ टन वाळलेल्या कडब्याचे उत्पादन मिळू शकते.

    संपर्क- डॉ. के. आर. कांबळे, ९४२१३२५५७५ डॉ. आर. आर. धुतमल, ७०३८०९१००४ डॉ. एल. एन. जावळे, ९४२१०८५९४७ (ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

    Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

    Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

    Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

    Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

    SCROLL FOR NEXT