For home grown vegetables ‘Jijai Nano Kitchen Garden’ 
ॲग्रो गाईड

घरच्या घरी भाजीपाल्यासाठी ‘जिजाई नॅनो किचन गार्डन’

घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी कमी खर्चात ‘जिजाई नॅनो किचन गार्डन’ची संकल्पना सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राने मांडली असून, सुमारे पावणेचार फूट बाय सव्वासहा फुटांच्या जागेत या गार्डनमधून ११ ते १३ प्रकारच्या भाज्या मिळू शकतात.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी कमी खर्चात ‘जिजाई नॅनो किचन गार्डन’ची संकल्पना सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राने मांडली असून, सुमारे पावणेचार फूट बाय सव्वासहा फुटांच्या जागेत या गार्डनमधून ११ ते १३ प्रकारच्या भाज्या मिळू शकतात.  कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे यांनी ही संकल्पना मांडली. त्यानुसार त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या घरी मॉडेल विकसित केले. त्यानंतर त्यांनी कृषी विज्ञान केंद्रात त्याची उभारणी केली. रासायनिक कीटकनाशक आणि तणनाशकांचा वापर भाजीपाल्यामध्ये वाढला आहे. पण आता त्यात बदल अपेक्षित आहे. किमान आपल्या कुटुंबासाठी, आरोग्यासाठी काही प्रयत्न व्हावेत, यासाठी ही संकल्पना आहे. मुख्यतः उत्तम आरोग्यासाठी सेंद्रिय पद्धतीने स्वतःचा भाजीपाला स्वतःच घरच्या घरी पिकवणे, हाच केवळ उद्देश या संकल्पनेमागे असल्याचे डॉ. तांबडे म्हणाले. एका कुटुंबासाठी पुरेसा घराच्या पटांगणात, परसबागेत, टेरेसवर हे मॉडेल उभा करता येते. पावणेचार फूट बाय सव्वासहा फूट जागेत प्लॅस्टिक पाइपच्या साह्याने शेडनेटच्या मांडवाखाली ते झाकले जाते. चार माणसांच्या कुटुंबाला आठवड्याला एक ते दीड किलो भाजीपाला यातून मिळतो, असा दावाही डॉ. तांबडे यांनी केला. साधारण सात हजार ते नऊ हजार रुपयांचा खर्च त्यासाठी येतो. अधिक माहितीसाठी गणेश कांबळे (९८५०८४८३५३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. तांबडे यांनी केले आहे.

अटारीकडून दखल भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत पुण्यातील कृषी तंत्रज्ञान अवलंबन व संशोधन संस्थेच्या (अटारी) इनोव्हेटिव्ह अॅप्रोचेस अॅण्ड इन्टरव्हेशन या देशातील कृषी विज्ञान केंद्रांच्या अहवालातही डॉ. तांबडे यांचा या संबंधीचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: नियतीनेच तोडला थुट्टे कुटुंबाचा ‘भरवसा’

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढला

Kharif Sowing: खरीप पेरण्यांत बारामती उपविभाग अव्वल

Maharashtra Agriculture Minister: कृषिमंत्री कोकाटे खानदेश दौरा अर्धवट सोडून परतले

Agri Officers Support: कृषिमंत्र्यांच्या समर्थनासाठी कृषी अधिकारी सरसावले

SCROLL FOR NEXT