health benefits of maka
health benefits of maka 
ॲग्रो गाईड

केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी माका ​

विनीता कुलकर्णी

माका सगळीकडे अगदी सहज मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. दलदलीच्या, पाणथळ भागात माका आढळून येतो. माक्याला पितृपंधरवड्यात विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त असते. माका औषधी म्हणूनही उत्तम काम करतो.

  • औषधी गुणधर्म असलेला माका केसांच्या आरोग्यासाठी उत्तम काम करतो.
  • माक्‍याचे तेल मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होते. हे तेल कोमट करून केसांच्या मुळांशी रोज किंवा एक दिवसाआड लावावे. शिवाय माका, ज्येष्ठमध, आवळा यांची समभाग पावडर पाण्यात मिसळून पेस्ट करावी. ही पेस्ट केसांच्या मुळांशी १५ मिनिटे लावून त्यानंतर केस धुवावेत.
  • माक्‍याच्या तेलामुळे केस गळणे, के सलवकर पांढरे होणे, चाई यावर चांगला परिणाम दिसून येतो.
  • त्वचाविकारांवर देखील माका प्रभावी काम करतो. त्वचेवर खाज येणे, बारीक पुरळ उठणे, सूज येत असेल तर माक्‍याचा रस चोळावा.
  • बऱ्याचदा थंड वाऱ्यामुळे त्वचेवर खाज सुटून गांधी उठतात. यालाच पित्त उठणे म्हणतात. अशावेळी माका रस त्याजागी चोळावा. योग्य पथ्य पाळावे.
  • यकृतासंबंधीचे विकार, भूक न लागणे, अजीर्ण, पोटाचे विकार यांवर माका उत्तम कार्य करतो. त्यासाठी माक्‍याचा रस खडीसाखर घालून द्यावा. शिवाय इतर पाचक औषधे पोटात घ्यावीत.
  • जास्त उन्हात काम केल्याने तसेच मानसिक ताणामुळे चक्कर येणे, तोल जाणे अशी लक्षणे तात्पुरती उद्‌भवतात. डोकेदुखीचा त्रास होतो. यासाठी माक्‍याचा रस १ चमचा प्रमाणात खडीसाखरेसह घ्यावा. शिवाय रस कपाळावर चोळावा.
  • कफाचा खोकला, श्‍वास या कफविकारामध्ये माका स्वरस मधासह चाटण स्वरूपात द्यावा. माक्‍याची पाने स्वच्छ धुऊन नंतर त्याचा स्वरस काढावा.
  • पथ्य 

  • जास्त तिखट, तळलेले पदार्थ, लोणचे, पापड, खारट पदार्थ, जेवणामध्ये वरून मीठ घेणे टाळावे.
  • अवेळी जेवण, शिळे अन्न खाणे टाळावे.
  • काळजी 

  • चक्कर जास्त येत असल्यास, तज्ज्ञांच्या सल्याने योग्य त्या तपासण्या जरूर कराव्यात.
  • केस पांढरे होणे, गळणे या गोष्टी आनुवंशिकतेने अकाली होतात, त्यांची दखल जरूर घ्यावी.
  • त्वचेवर खूप खाज येऊन वारंवार त्रास होत असल्यास, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधे घ्यावीत.
  • जास्त कफ, ताप, अंगदुखी, श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • संपर्क - डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

    Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

    Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

    Indian Farmer : बळीराजा जागा हो...

    Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

    SCROLL FOR NEXT