infestation of mealy bug on custard apple
infestation of mealy bug on custard apple 
ॲग्रो गाईड

सीताफळावरील पिठ्या ढेकूण नियंत्रण व्यवस्थापन

डॉ. धीरजकुमार कदम, विलास खराडे 

पिठ्या ढेकूण (मिलीबग)ही कीड झाडाच्या सालीच्या खाली, फळांच्या आणि फांद्यांच्या फटीत राहते. चिवट कापसासारख्या पांढऱ्या पदार्थाच्या आवरणामध्ये ती अंडी घालते. पूर्ण वाढलेल्या किडीच्या शरीरावरही मेणचट पांढुरक्या रंगांचे आवरण असते. पिठ्या ढेकूण (मिलीबग)ही कीड झाडाच्या सालीच्या खाली, फळांच्या आणि फांद्यांच्या फटीत राहते. चिवट कापसासारख्या पांढऱ्या पदार्थाच्या आवरणामध्ये ती अंडी घालते. पूर्ण वाढलेल्या किडीच्या शरीरावरही मेणचट पांढुरक्या रंगांचे आवरण असते. त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी अंड्यापर्यंत किंवा किडीच्या शरीरापर्यंत पोचू शकत नाही. किडीची ओळख आणि जीवनक्रम प्रौढ मादीचे शरीर अंडाकृती, सपाट आणि मऊ असून रंग पांढरट लालसर असतो. डोके आणि पोट स्पष्टपणे वेगळे नसतात. अंडी मादी सैलसर कापसासारख्या पुंजक्यात जवळपास ६०० अंडी घालते. अंडी वाढत्या शेंड्यावर, फळांवर, सालीखाली, जमिनीलगत खोडाभोवती दिसून येतात. अंडी अंडाकृती, नारंगी रंगांची असतात. पिल्ले अंड्यातून संथपणे सरपटणारी नारंगी व विटकरी लाल रंगाची पिल्ले बाहेर पडतात. पूर्ण झाडावर ती पसरतात. पिल्ले फळे व कोवळ्या फांद्यांवर थांबतात. या अवस्थेत किडीवर पांढऱ्या रंगाचा मेणचट पदार्थ नसतो, त्यामुळे कीटकनाशकांचा योग्य परिणाम होतो. किडीची एक पिढी सरासरी ३० दिवसात पूर्ण होते. एका वर्षात जवळजवळ १२ ते १५ पिढ्या पूर्ण होतात.  नुकसानीचा प्रकार 

  • पिल्ले व प्रौढ पाने, कोवळ्या फांद्या, कळ्या आणि कोवळी फळे यातून रस शोषण करतात. परिणामी पानांचा, फळांचा आकार वेडावाकडा होतो. त्यामुळे झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. 
  • नवीन फुटींची व पानांची वाढ खुंटते. फळांची वाढ अयोग्य होऊन आकार वेडावाकडा होतो. 
  • कीड शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ स्रवते. त्यावर काळी बुरशी वाढते. परिणामी पाने व फळे काळी पडतात. फळांना बाजारभाव मिळत नाही.
  • एकात्मिक कीड नियंत्रण  जमिनीची खोलवर नांगरट करावी. जमीन उन्हात चांगली तापू द्यावी. त्यामुळे जमिनीत असणाऱ्या किडींच्या अवस्था नष्ट होतात. पिठ्या ढेकूण झाडावर चढू नये यासाठी १५ ते २० सें.मी. रुंदीची प्लास्टिक पट्टी ग्रीस लावून खोडावर बांधावी. पिठ्या ढेकूण  या चिकट पट्ट्यांना चिकटून मरतात. बाग व बागेभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. बागेशेजारी भेंडी, कपाशी ही पिके घेऊ नयेत, कारण या पिकांवर ही कीड मोठ्या प्रमाणावर वाढते. परभक्षी मित्रकीटक क्रिप्टोलिमस मॉन्टरोझायरी प्रति एकरी ६०० या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा बागेत झाडावर सायंकाळच्या वेळी सोडावेत. भुंगेरे सोडल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकाची बागेवर फवारणी करू नये. आर्द्रतायुक्त हवामान असल्यास व्हर्टीसिलीयम लेकॅनी हे जैविक कीटकनाशक अधिक ४ ग्रॅम फिश ऑईल रोझीन सोप ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.  फवारणी (प्रति लिटर पाणी)

  • बुप्रोफेझीन (२५ एस.सी)२ मिलि अधिक फिश ऑईल रोझीन सोप २.५ मिलि  किंवा
  • डायमेथोएट (३० ई.सी)२ मिलि प्रति लिटर पाणी अधिक फिशऑईल रोझीन सोप २.५ मिलि.
  • टीप - वरील प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसाच्या अंतराने करावी. संपर्क : डॉ. धीरजकुमार कदम (सहयोगी प्राध्यापक), ९४२१६२१९१०  विलास खराडे (पीएच.डी. स्कॉलर), ९४२१५९६१७९  (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी  विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

    Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

    Food Grains : भरडधान्येच तारतील; आर्थिक आधार देतील

    River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

    Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

    SCROLL FOR NEXT