linseed
linseed 
ॲग्रो गाईड

जवस : एक सुपर फूड

डॉ. राजेश क्षीरसागर, ऋषिकेश माने

जवस  पिकाचा प्रत्येक भाग हा व्यावसायिकरित्या उपयोगी आहे. जवसाच्या आरोग्यदायी गुणधर्मामुळे त्याचा मानवी आहारात उपयोग वाढला आहे. 

जवस हे एक अलीकडच्या काळात सुपर फूड   म्हणून पुढे येत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यातील अधिक प्रमाणात असलेले ओमेगा-३ स्निग्ध आम्ल, लिग्नीन तंतुमय पदार्थांचे आरोग्यास असलेले फायदे. यामध्ये हृद्यासंबंधित आजार, रक्तामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण, मधुमेह, कर्करोग, अस्थिरोग आणि मज्जासंस्थेवरील आजारावर परिणामकारकरीत्या उपाय आहेत. 

  • जवसामध्ये असणारे प्रथिने रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करते. जवसाच्या तेलाचा बेकरी, दुग्धजन्य पदार्थ, फळांचे रस, नूडल्स अशा अनेक खाद्यपदार्थांमध्ये त्यांची पोषण तत्त्वे वाढविण्यास उपयोग केला जातो.  
  • जवसामध्ये ओमेगा-३ स्निग्ध आम्ल जसे की, अल्फा लिनोलेनिक आम्ल, तंतुमय पदार्थ, प्रथिने आणि अॅन्टीऑक्सिडन्टस हे मुबलक प्रमाणात आहेत. याचा फायदा हृद्यासंबंधित आजार, रक्तामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण, मधुमेह, कर्करोग, अस्थिरोग आणि मज्जासंस्थेवरील आजारावरील उपायांसाठी केला जातो. 
  • खाद्य तेलबियांच्या बरोबरीने औषधी, औद्योगिक उपयुक्तता, पशुआहार, झाडाच्या तंतुंपासून कापडनिर्मिती असे जवसाचे उपयोग आहेत.
  • जवसाचे आरोग्यास असणारे  फायदे

    वजन कमी करण्यास मदत  जवसाच्या बियांमध्ये तंतुमय पदार्थ आहेत, जे वजन कमी करण्यास मदत करतात. एक उत्कृष्ट पोषक तत्त्व आहे.  आहारात उपयोगी पोषक तत्त्वांचा पुरवठा   जवसामध्ये आहाराच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे पोषक तत्त्वे आहेत. ते ओमेगा ३ स्निग्धाम्ले, अ, ड, इ जीवनसत्त्व आणि कॅल्शिअम फॅास्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत आहे. रक्तातील कॉलेस्टरॉल कमी करण्यास मदत    जवस बियांमधील तंतूमय पदार्थ रक्तात उपस्थित खराब कोलेस्टेरोलला बांधतात आणि शरीरातून ते काढण्यास साहाय्य करतात. वजन आटोक्यात ठेवतात.   हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत   जवस बियांमध्ये ओमेगा ३ स्निग्धाम्ले विशेषकरून अल्फा लिनोलेनिक आम्ल हे चांगल्या प्रमाणात आहे. जवस बिया तुमच्या हृदयासाठी एक योग्य आहार आहे. त्याने रक्तवाहिन्यामध्ये गाठी बनण्याचा धोका कमी होतो. अस्थिरोगावर उपयुक्त   जवसामध्ये प्रथिनांचे व कॅल्शिअम आणि फॅास्फरसचे  प्रमाण मुबलक प्रमाणात आहे त्यामुळे हाडे मजबूत होतात व हाडांचे दुखणे कमी होते.  यकृत निरोगी ठेवण्यास मदत  जवसामध्ये असलेल्या अॅन्टीऑक्सिडन्टसमुळे यकृताचे डीटॉक्स करण्यात मदत होते. अॅन्टीऑक्सिडन्टस यकृतातील विषारी व अपायकारक पदार्थ काढण्यास मदत करतात. पचन क्रिया चांगली होण्यास मदत  आहारात जवसाचा वापर करावा. ज्यामुळे भूक चांगली लागते. पचनक्रिया चांगली होते. जवसातील तंतुमय पदार्थ पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. यामुळे बधाकोष्टतेवरही फायदा होतो. त्वचेसाठी उपयोगी  जवसामध्ये असणाऱ्या अॅन्टीऑक्सिडन्टस गुणांमुळे त्वचेसाठी फायदेशीर ठरते. त्वचेमध्ये कोलेजनचे प्रमाण वाढते आणि नव्या  पेशी तयार होतात. त्वचा निरोगी राहाते.  महिलांच्या समस्या दूर करण्यात मदत   जवसामुळे महिलांचे हार्मोन बॅलन्स नियंत्रित राहते. यामध्ये असणारे फायटोइस्ट्रोजेन हे मासिक पाळी संबंधी समस्यांवर उपायकारक आहेत. त्यामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत होते.

    - डॉ. राजेश क्षीरसागर, ९८३४९०५५८० (अन्न अभियांत्रिकी विभाग,अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT