maize for fodder
maize for fodder 
ॲग्रो गाईड

मुरघासासाठी मका लागवड

डॉ. विठ्ठल कौठाळे, प्रमोदकुमार ताकवले

मक्याच्या आफ्रिकन टॉल जातीची  दोन ओळींमध्ये ३० सें.मी. अंतर राखून पेरणी करावी.हेक्‍टरी ७५ किलो बियाणे लागते. कापणी पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना करावी. ही अवस्था साधारणपणे पेरणीनंतर सत्तर ते पंचाहत्तर दिवसांनी येते.

म का हे पौष्टिक चारा पीक आहे. मुरघास बनविण्यासाठी हे पीक अत्यंत महत्त्वाचे आहे. मक्याच्या आफ्रिकन टॉल जातीमध्ये ९ ते १० टक्के प्रथिने आणि ८.६ टक्के तंतुमय पदार्थ असतात. मक्‍यामधील शुष्कभागाची ६१ टक्के आणि प्रथिनांची पचनियता ६७ टक्के आहे. 

  •   चांगल्या उत्पादनासाठी गाळाची, कसदार, पाण्याचा चांगला निचरा असणारी व मध्यम खोलीची जमीन लागते. तांबड्या जमिनीमध्ये सुध्दा हे पीक चांगले येते. 
  •  जमिनीची खोल नांगरट करून, पहिल्या काकरपाळीनंतर शेणखत जमिनीवर पसरवून दुसरी काकरपाळी करावी.  
  •   आफ्रिकन टॉल जातीचे बियाणे मोठ्या आकाराचे असते. त्यामुळे हेक्‍टरी ७५ किलो बियाणे लागते. या पिकाची पेरणी बियाणे फेकून किंवा पाभरीने केली जाते. पेरणीच्या या पध्दतीपैकी ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने चालविलेल्या पेरणीयंत्राद्वारे किंवा बैलाने चालणाऱ्या पाभरीद्वारे केलेली पेरणी ही सर्वात चांगली पध्दत आहे. पेरणीमुळे दोन ओळीतील अंतर व दोन रोपांतील अंतर नियंत्रित रहाते.  दोन ओळीमध्ये ३० सें.मी. अंतर राखून पेरणी करावी. 
  •  पेरणीच्या अगोदर दहा किलो बियाणास २५० ग्रॅम ॲझोटोबॅक्‍टरची प्रक्रिया करावी. मक्‍याची पेरणी वर्षभर केव्हाही करता येते. 
  •  मका पिकाला प्रति हेक्टरी ८० ते  १०० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. पेरणीच्यावेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाशची मात्रा द्यावी. पीक पेरणीनंतर एक महिन्याने राहिलेली ५० टक्के नत्राची मात्रा द्यावी. 
  •  पीक उगवून आल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांनी तण नियंत्रणासाठी  खुरपणी करावी. खुरपणी केल्याने पिकाच्या मुळांना मोकळी हवा मिळते. पिकाची जोमदार वाढ होते. तण लहान असतानाच खुरपणी केल्यास फायद्याचे ठरते. चवळीचे दहा किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरून मक्‍यामध्ये मिश्रपीक घेतल्यास ६० टक्केपर्यंत तणांचे नियंत्रण होते. शिवाय शुष्कभागाचे हेक्‍टरी ५० टक्के अधिक उत्पादन मिळते. 
  • कापणी आणि उत्पादन   कापणी पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना करावी. ही अवस्था साधारणपणे पेरणीनंतर सत्तर ते पंचाहत्तर दिवसांनी येते. या वाढीच्या अवस्थेत प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. यानंतर जसजसे कापणीला जास्त दिवस लागतील तसतसे प्रथिनांचे प्रमाण कमी होते. म्हणून पिकाची कापणी कणसातील दुधी अवस्था येण्यापूर्वी पूर्ण करावी. पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना कापणी करावी. ही अवस्था साधारणपणे पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी येते. हेक्‍टरी ६० ते ७५ टन चारा उत्पादन मिळते.

    - डॉ.विठ्ठल कौठाळे,   ९८३४६६२०९३  (बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, मध्यवर्ती संशोधन केंद्र,उरुळी कांचन,जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

    Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

    Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

    Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

    Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

    SCROLL FOR NEXT