banana cultivation
banana cultivation 
ॲग्रो गाईड

नियोजन केळी लागवडीचे

डॉ. के. बी. पवार

केळी लागवडीसाठी कंद मुनवे, निरोगी आणि जातिवंत बागेतून निवडावे. कंद ३ ते ४ महिने वयाचे, उभट किंवा नारळाच्या आकाराचे आणि ४५० ते ७५० ग्रॅम वजनाचे असावेत. कंदावर ३ ते ४ रिंगा ठेवून खालील बाजूने वरचेवर कंद तासून घ्यावा. लागवडीसाठी ऊतिसंवर्धित रोपांचाही पर्याय उपलब्ध आहे. लागवडीसाठी जातिवंत जातीची, विषाणू निर्देशांक तपासलेली निरोगी रोपे निवडावीत.

महाराष्ट्रामध्ये केळी पिकाची जून महिना (मृगबाग) आणि ऑक्टोबर महिन्यात (कांदेबाग) लागवड केली जाते. हवामानाचा केळीच्या वाढीवर, घड येण्याच्या व घड तयार होण्याच्या कालावधीवर परिणाम होत असतो. त्यामुळे हवामानानुसार केळी लागवडीचा मोसम हा बदलत असतो. मृग बागेची लागवड मुख्यत: जून महिन्यात करतात. सध्या मृग हंगामास सुरुवात झाली आहे. केळी बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. बाग नेहमी तणमुक्त ठेवावी. सोसाट्याच्या वाऱ्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी बागेभोवती २ मीटर अंतरावर शेवरी, बांबू, सुरू, गिरिपुष्प किंवा निरगुडी या झाडांचे सजीव कुंपण तयार करावे.

जमीन  लागवडीसाठी मध्यम ते भारी, भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ८ च्या दरम्यान असावा. क्षारयुक्त, चोपण व चुनखडीयुक्त जमिनीमध्ये केळीची लागवड करू नये.

जाती  फुले प्राइड, ग्रॅंड नैन, श्रीमंती

लागवडीचे अंतर  चौरस पद्धत : १.५ बाय १.५ मी.

कंद निवड 

  • लागवडीसाठी कंद मुनवे, निरोगी आणि जातिवंत बागेतून निवडावे. कंद ३ ते ४ महिने वयाचे, उभट किंवा नारळाच्या आकाराचे आणि ४५० ते ७५० ग्रॅम वजनाचे असावेत.
  • कंदावर ३ ते ४ रिंगा ठेवून खालील बाजूने वरचेवर कंद तासून घ्यावा. लागवडीसाठी ऊतिसंवर्धित रोपांचाही पर्याय उपलब्ध आहे. 
  • लागवडीसाठी जातिवंत जातीची, विषाणू निर्देशांक तपासलेली निरोगी रोपे खरेदी करावीत. ऊतिसंवर्धित रोपे एकसारख्या वाढीची, ३० ते ४५ सेंमी उंच आणि किमान ६ ते ७ पाने असलेली निवडावीत.
  • खत व्यवस्थापन  सेंद्रिय खते प्रति झाड १० किलो शेणखत किंवा ५ किलो गांडूळखत

    जैविक खते  लागवडीच्या वेळी २५ ग्रॅम ॲझोस्पिरीलम व २५ ग्रॅम पी. एस. बी. शेणखतात मिसळून द्यावे.

    रासायनिक खते   प्रति झाड २०० ग्रॅम नत्र, ६० ग्रॅम स्फुरद व २०० ग्रॅम पालाश देण्याची शिफारस आहे. रासायनिक खतांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्यासाठी  बांगडी पद्धतीने खोलवर खते देऊन मातीने झाकावीत.

     - डॉ. के. बी. पवार, ०२५७-२२५०९८६ (अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), केळी संशोधन केंद्र, जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT