लाळ्या खुरकूत रोगाची लक्षणे
लाळ्या खुरकूत रोगाची लक्षणे 
ॲग्रो गाईड

लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण

गो संशोधन व विकास प्रकल्प

सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत बऱ्याच भागांत लाळ्या खुरकूतची साथ येते. हा रोग खूर विभागलेल्या जनावरांना होतो. हा रोग प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व खाद्य खाल्ल्याने होतो.

  •  रोगाची लक्षणे म्हणजे जनावराचे खाणे-पिणे बंद होते. जनावरास ताप येतो. दुधाळ जनावरांत दूध उत्पादनात घट येते. काही वेळेस उत्पादनक्षमता कायमची नष्ट होण्याची शक्‍यता असते.
  •  जनावराच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागांत फोड येतात. जनावराच्या तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते. पुढील पायांमध्ये खुरांतील बेचकीमध्ये फोड येतात व जनावरास मागील पायांत फोड तयार झाल्यास अपंगत्व येते.
  •  पायाने अधू असलेले पीडित जनावर रोगग्रस्त पायसारखे झटकत असते.
  • प्रतिबंधात्मक उपाय

  •  रोगाच्या साथीच्या काळात रोगी जनावरे कुरणात चरण्यासाठी जाऊ देऊ नयेत. रोगाचा प्रसार लाळेतून होत असल्याने रोगी जनावरांनी खाल्लेला चारा इतर जनावरांना खाऊ देऊ नये.
  •  रोगी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी करावीत व त्यांच्यावर औषधोपचार करावा. रोगी जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता वेगळ्या ठिकाणी पाणी पाजावे.
  •  रोगी जनावरे बांधण्याची जागा रोज किमान एकदा जंतुनाशकाने धुवावी. जनावरांचे दूध काढण्याची भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावीत म्हणजे त्यांचे निर्जंतुकीकरण होईल व रोगप्रसार टळेल.
  •  सर्व जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्‍यतो होत नाही. या रोगाच्या नियंत्रणासाठी लसीकरण सप्टेंबर आणि मार्चमध्ये करावे.
  • - ०२४२६- २४३३६१ गो संशोधन व विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Water Storage : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

    Green Hydrogen Project : हिमाचल प्रदेशच्या झाकरीत देशातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प

    Sustainable food : कार्बन फूटप्रिंट की शाश्‍वत अन्न?

    Mumbai APMC Scam : संजय पानसरे यांना न्यायालयीन कोठडी

    Elephant Issue in Germany : हत्तींवरून दोन देशांमध्ये रणकंदन

    SCROLL FOR NEXT