चिकू पिकातील फळगळ
चिकू पिकातील फळगळ 
ॲग्रो गाईड

चिकू पिकातील फळगळीचे वेळीच नियंत्रण आवश्‍यक

ए. एस. ढाणे, डॉ. आर. डी. तुंबडा, डॉ. एस. बी. गंगावणे

फळगळ रोगकारक बुरशी : फायटोप्थोरा पाल्मीवोरा अनुकूल परिस्थिती : चिकू फळबागेतील हा एक अतिशय महत्त्वाचा रोग आहे. रोगाचा प्रसार जुन्या व घनदाट बागांमध्ये तसेच अधिक पावसाच्या कालावधीत होतो. अनुकूल परिस्थिती नसताना रोगाची बुरशी झाडांच्या वाकलेल्या फांद्या, पालापाचोळा, झाडांचे मृत अवशेष यांच्यावर सुप्तावस्थेत आढळते. ज्या वेळेस पावसाचे प्रमाण वाढते (हवेतील आर्द्रता ९० टक्क्यांपेक्षा जास्त) तेव्हा बुरशीचे सुप्तावस्थेतील बिजाणू रुजतात व रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते.

प्रादुर्भावामागील संभाव्य कारणे

  • मोठी आणि एकमेकांत फांद्या मिसळलेली झाडे असलेल्या जुन्या चिकू बागा.
  • गर्द झाडीमुळे ज्या बागांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश खेळत नाही अशा बागा.
  • बागातील स्वच्छता नीट ठेवली जात नाही अशा बागा.
  • झाडांची दाटी झाल्यामुळे जेथे फवारणी व आंतरमशागत परिणामकारकरीत्या होत नाही अशा बागा.
  • जमिनीची वरचेवर मशागत होत नाही अशा बागा.
  • लक्षणे रोगाचा प्रादुर्भाव जास्त करून फळांवर दिसून येतो. बुरशीची वाढ कळी अवस्था ते मोठ्या पक्व फळांची अवस्था अशा सर्वच अवस्थांवर होते. प्रादुर्भावग्रस्त फळे काळी पडतात, कुजतात व गळून पडतात. त्यामुळे उत्पादकांचे अतोनात नुकसान होते.

    नियंत्रण उपाययोजना

  • प्रादुर्भावग्रस्त फळे, फांद्या, पालापाचोळा गोळा करून नष्ट करावा.
  • बाग स्वच्छ ठेवावी. झाडांची छाटणी करून जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पोचेल असे नियोजन करावे.
  • पावसाळ्यापूर्वी झाडावर १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
  • आवश्‍यकतेनुसार एक महिन्याच्या अंतराने आणखी दोन फवारण्या कराव्यात. पावसात द्रावण चिकटून राहण्यासाठी सरफेक्टंट १ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात द्रावणात मिसळावे.
  • संपर्क : ए. एस. ढाणे, ७०२८०६५६२६   (लेखक कृषी संशोधन केंद्र, पालघर, जि. पालघर येथे कार्यरत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

    Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

    Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

    Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

    Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

    SCROLL FOR NEXT