हळदकंद शिजविण्यासाठी आयाताकृती कुकरचा वापर
हळदकंद शिजविण्यासाठी आयाताकृती कुकरचा वापर  
ॲग्रो गाईड

योग्य प्रक्रियेतून वाढते हळदीची गुणवत्ता

डॉ. जितेंद्र कदम, डॉ. केशव पुजारी

आयताकृती कुकर व सच्छिद्र ड्रमचा वापर केल्याने समप्रमाणात हळदकंद शिजतात. हळदकंद शिजविल्यानंतर त्यांचे पॉलिशिंग करणे हीसुद्धा महत्त्वाची बाब आहे. सुधारित पद्धतींचा अवलंब केल्याने स्वच्छ व योग्यप्रकारे पॉलिश केलेले हळदकंद मिळतात.

सच्छिद्र ड्रमच्या वापराने शिजलेले मातीविरहित हळदकंद मिळतात. आयताकृती कुकरच्या वापराने लवकर हळदकंद शिजवता येतात. त्यामुळे हळदकंज शिजविण्यासाठी या पद्धतींचा अवलंब फायद्याचा राहतो. सच्छिद्र ड्रमचा वापर

  • या पद्धतीमध्ये डिझेलच्या ड्रमचा वापर केला जातो. ड्रमच्या पत्र्यापासून ४५ सें.मी. उंचीचे व ६० सें.मी. व्यासाचे चार ते पाच सच्छिद्र ड्रम बनवून त्यांचा वापर केला जातो.
  • हळदकंद २५० सें.मी. व्यासाच्या मोठ्या कायलीमध्ये भरून ठेवतात. मोठ्या कायलीमध्ये पाणी ओतून पाण्याची पातळी ड्रमच्या उंचीच्या वर पाच ते सहा सें.मी. इतकी ठेवली जाते. ड्रम गोणपाटाने झाकले जातात.
  • या पद्धतीमध्ये हळद फक्त २४ ते ३० मिनिटांत चांगली शिजते. प्रत्येक वेळी कायलीतील पाणी सोडण्याची आवश्‍यकता भासत नाही. त्यामुळे एक एकर क्षेत्रावरील हळद दोन दिवसांत शिजून तयार होते.
  • हळद शिजताना हळकुंडावरील माती कायलीत जमा होते, त्यामुळे मातीविरहीत स्वच्छ हळद मिळते.
  • आयताकृती कुकरचा वापर

  • ही पद्धत तमिळनाडू कृषी विद्यापीठ, कोईमतूर यांनी विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये ०.५ मीटर x ०.७ मीटर x ०.५ मीटर आकाराचे सच्छिद्र ट्रे हळद कंदांनी पूर्णपणे भरतात. हे ट्रे पाणी भरलेल्या १.२ मीटर x ०.९ मीटर x ०.७५ मीटर आकाराच्या मोठ्या चौकोनी ट्रेमध्ये ठेवतात.
  • ह्या पद्धतीमध्ये मोठ्या ट्रेमध्ये ३/४ भरलेल्या उकळत्या पाण्यात छोट्या ट्रेमधील हळदकंद शिजतात. त्यामुळे ते सर्व हळदकंद समप्रमाणात शिजले जातात.
  • पॉलिश

  • शिजवून वाळलेल्या कंदावरील सुरकुतलेली जाड साल आणि मातीचा थर काढून टाकावा. हळकुंड आकर्षक बनवण्यासाठी पॉलिश करावे.
  • हळकुंड कमी प्रमाणात असल्यास ती खडबडीत पृष्ठभागावर जोराने घासून तिला पॉलिश करावे. किंवा जुनी पोती पायास बांधून ती हळदीवर घासावीत.
  • भरपूर प्रमाणावर हळकुंड असल्यास पॉलिश करण्यासाठी ट्रॅक्‍टरचलीत किंवा इलेक्‍ट्रीक मोटारचलीत पॉलिश यंत्राचा वापर करावा.
  • पाच क्विंटल ओल्या हळदीपासून १ क्विंटल सुकलेली हळद तयार होते. परंतु, जाती परत्वे उताऱ्याचे प्रमाण कमी-जास्त असते. फुले स्वरुपा- २२ टक्के उतारा, सेलम - २० टक्के उतारा, कृष्णा - १८ टक्के उतारा, वायगाव - २० टक्के उतारा. एक क्विंटल सुकलेल्या हळदीपासून पॉलिश केल्यानंतर ९० ते ९२ किलो विक्रीयोग्य हळद तयार होते.
  • हळकुंडांची प्रतवारी हळदीला चांगले दर मिळविण्यासाठी हळदीची प्रतवारी करणे महत्त्वाचे ठरते. निर्यातीसाठी आणि देशातील व्यापारासाठी ॲगमार्कचे खालील निकष ठरविले आहेत.

    निर्यातीसाठी :

  • विशेष  : ३ टक्के तुकडे, १ टक्का कचरा, २ टक्के चुरा, २ टक्के गोल गड्डे, २ टक्के इतर जातींची भेसळ.
  • उत्तम : ५ टक्के तुकडे, १.५ टक्के कचरा, ५ टक्के चुरा, ३ टक्के गोल गड्डे, ५ टक्के इतर जातींची भेसळ.
  • चांगला : ७ टक्के तुकडे, २ टक्के कचरा, ७ टक्के चुरा, ५ टक्के गोल गड्डे, १० टक्के इतर जातींची भेसळ.
  • सामान्य : प्रतवारी न केलेली हळद.
  • देशांतर्गत बाजारपेठेसाठी :

  • लांब हळकुंडे (५ सें.मी. पेक्षा जास्त लांब)
  • मध्यम हळकुंडे (३-५ सें.मी. लांब)
  • लहान हळकुंडे किंवा चुरा (३ सें.मी. पेक्षा लहान हळकुंडे).
  • संपर्क :  डॉ. जितेंद्र कदम, ९८२२४४९७८९ (काढणीपश्‍चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था, रोहा, जि. रायगड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

    POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

    Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

    Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

    Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

    SCROLL FOR NEXT