Pomegranate trees should be covered with a cloth to protect them from the sun.
Pomegranate trees should be covered with a cloth to protect them from the sun. 
ॲग्रो गाईड

डाळिंब सल्ला

डॉ. एन. व्ही. सिंह, दिनकर चौधरी

हस्त बहर उशिरा घेतला असेल तर फळांना बटर पेपर बॅग ने झाकून पिशवीचे खालचे तोंड उघडे ठेवावे. किंवा डाळिंब झाडांची पूर्ण ओळ झाकण्यासाठी क्रॉपकव्हरचा वापर करावा.  हस्त बहर (सप्टेंबर-ऑक्टोबर पीक नियमन)  बागेची अवस्था  फळे तोडणी आणि फळे तोडणीनंतर झाडांना विश्रांती. बागेची मशागत

  • हस्त बहर उशिरा घेतला असेल तर फळांना बटर पेपर बॅग ने झाकून पिशवीचे खालचे तोंड उघडे ठेवावे. किंवा डाळिंब झाडांची पूर्ण ओळ झाकण्यासाठी क्रॉपकव्हरचा वापर करावा. 
  •  क्रॉपकव्हरने शेंड्यापासून दोन्ही बाजूंस १.५ ते ३.० फूट झाकावे. जेणेकरून तीव्र सूर्यकिरणांमुळे फळांचे होणारे नुकसान टाळले जाईल. क्रॉपकव्हर झाकतांना झाडाची उंची आणि घेर विचारात घ्यावे. जेणेकरून पश्‍चिमेकडील बाजू ६० टक्क्यांपर्यंत झाकली जाईल. कारण त्याबाजूस दुपारनंतरचे ऊन प्रखर असते. क्रॉपकव्हरचा वापर केल्याने काही प्रमाणात अजैविक कारणाने होणारी फळफूट कमी होते.
  •  फळे असलेल्या फांद्यावर फळांचा भार जास्त असेल तर त्यांना बांधून आधार द्यावा.
  •  हस्त बहराची फळे तोडून झाल्यावर मध्यम ते जास्त छाटणीची शिफारस करण्यात येते. यामध्ये रोगग्रस्त, गुंतलेल्या, मोडलेल्या, वाळलेल्या, गर्दी असलेल्या फांद्या काढाव्यात. आणि अन्नद्रव्यांचा बेसल डोस द्यावा.
  • आंबिया बहर (जानेवारी-फेब्रुवारी बहर नियमन)  बागेची अवस्था   फळ धारणा आणि फळाची वाढ. बागेची मशागत 

  •  कोवळी फूट अधिक असेल तर कोवळे शेंडे खुडणे.
  •  फळधारक फांद्यांना आणि झाडांना बांधून आधार देणे.
  •  प्रखर सूर्यप्रकाशामुळे फळांवर डाग पडण्याची शक्यता आहे.
  •  फळ लिंबू आकाराचे किंवा १०० ग्रॅम वजनाचे झाल्यानंतर प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्यावर डाग पडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी फळे संरक्षक पिशवीने किंवा पूर्ण ओळ क्रॉप कव्हरने झाकावी.
  • -  दिनकर चौधरी,  ०२१७-२३५००७४ (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT