aphids infestation
aphids infestation 
ॲग्रो गाईड

उन्हाळी भुईमुगातील एकात्मिक कीड व्यवस्थापन

डॉ. प्रमोद मगर, डॉ. अनिल ठाकरे, डॉ. सुरेश नेमाडे

भुईमूग पीक तीनही हंगामांत घेतले जाणारे पीक असून, निरनिराळ्या किडी, रोग व तणांच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी या पिकाचे मोठे नुकसान होते. भुईमूग पिकावरील कीड व रोगांचे वेळीच एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भुईमुगावरील किडी

  • भूमिगत किडी - वाळवी, हुमणी अळी, मुळे खाणारी अळी,  
  • रस शोषक किडी - फुलकिडे, तुडतुडे, मावा, 
  • पतंगवर्गीय किडी -  पाने पोखरणारी अळी (नागअळी), लाल केसाळ अळी, बिहारी केसाळ अळी व तंबाखूवरील पाने खाणारी अळी. 
  • रोग :  मूळकुज, मानकुज, मर रोग, तांबेरा टिक्का (पानावरील ठिपके), शेंडेमर/ बड नेक्रोसिस, भुईमुगावरील स्ट्राईप विषाणू, भुईमूगावरील रोझेट विषाणू इ. 
  • फुलकिडे 

  • अतिशय लहान फुलकिडे पानाच्या कोवळ्या शेंड्यामध्ये व पानांवर दिसून येतात. 
  • लहान पिल्ले व प्रौढ पानावर खरडून त्यातून निघालेल्या अन्नरसाचे शोषण करतात. पानावर पांढरे-पिवळसर फिक्कट चट्टे पडतात. 
  • पानाच्या खालचा भाग तपकिरी रंगाचा होतो. सूर्यप्रकाशात पाहिल्यास तो चमकतो. 
  • वाहक :  फुलकिडे हे शेंडेमर किंवा बड नेक्रोसिस या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात.
  • आर्थिक नुकसान पातळी- ५ फुलकिडे प्रती शेंडा (घडी केलेल्या पानांमध्ये)
  • तुडतुडे 

  • हिरवे, पाचरीच्या आकाराचे, चाल तिरकस. 
  • पिल्ले व प्रौढ पानाच्या खालच्या बाजूने राहून पानातील रस शोषतात. पाने पिवळी पडतात. प्रादुर्भावग्रस्त पानाच्या शेंड्यावर “V” आकाराचे चट्टे दिसून येतात. अशा करपलेल्या पानांवरील लक्षणांना ‘हॉपर बर्न’ म्हणतात. 
  • या किडीचा प्रादुर्भाव खरीप हंगामात ऑगष्ट- सप्टेंबर महिन्यात आणि उन्हाळी हंगामात फेब्रुवारी- मार्च महिन्यात अधिक आढळतो.
  • आर्थिक नुकसान पातळी - ५ ते १० तुडतुडे प्रति झाड. (पीक उगवणींनंतर ३० दिवस), त्यानंतर १५ ते २० तुडतुडे प्रती झाड.
  • मावा 

  • लहान आणि अंडाकृती, काळपट, लालसर, तपकिरी किंवा पिवळसर रंग. 
  • पिल्ले व प्रौढ सतत पानातील रस शोषतात. 
  • शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या गोड मधासारख्या चिकट द्रवावर काळ्या बुरशींची वाढ होते. कालांतराने पाने चिकट व काळी पडतात. प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते. झाडाची 
  • वाढ खुंटते. या किडीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडांची पाने सुरवातीला पिवळी  होऊन गळून पडतात. कालांतराने संपूर्ण झाड वाळते. 
  • वाहक :  मावा भुईमूगावरील स्ट्राईप विषाणू (Peanut stripe virus), पर्णगुच्छ आणि भुईमूगावरील रोझेट विषाणू या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात.
  • आर्थिक नुकसान पातळी : ५ ते १० मावा प्रति शेंडा (सुरवातीच्या अवस्थेत.)
  • केंद्रीय कीटकनाशक मंडळ, फरिदाबाद शिफारशीत कीडनिहाय कीडनाशके  

    कीड कीटकनाशक (प्रमाण प्रति १० लिटर पाणी)
    मावा, मुळे खाणारी अळी क्लोरपायरिफॉस (२०% ईसी) २० मि.लि.
    वाळवी  थायामेथोक्झाम (७५% एसजी) २.५ ग्रॅम
    मावा, तुडतुडे इमिडाक्लोप्रिड (१७.८% एसएल) २.५ मि.लि.
    तुडतुडे, फुलकिडे क्विनॉलफॉस (२५% ईसी) १४ ते २८ मि.लि.
    तुडतुडे, फुलकिडे, लीफ मायनर लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५% ईसी) ५ मि.लि.
    लीफ मायनर (पाने पोखरणारी अळी) डेल्टामेथ्रिन (२.८% ईसी) १२.५ मि.लि.
    क्विनॉलफॉस (२५% ईसी) २० मि.लि.
    तुडतुडे, लष्करी अळी, स्पोडोप्टेरा लिट्यूरा थायामेथोक्झाम (१२.६%) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (९.५% झेडसी) ३ मि.लि.
    वाळवी, फुलकिडे, तुडतुडे, मुळे खाणारी अळी, मान कुजव्या, खोड सड, टिक्का व तांबेरा रोग   इमिडाक्लोप्रिड (१८.५०%) अधिक हेक्झाकोनॅझोल (१.५०% एफएस) २ मि.लि. प्रति किलो बियाणे.

    एकात्मिक कीड व्यवस्थापन 

  • पिकांची फेरपालट करावी. शक्यतो सोयाबीन पीक घेतल्यानंतर भुईमूग पीक घेऊ नये.
  • बीजप्रक्रिया - इमिडाक्लोप्रिड (१८.५०%) अधिक हेक्झाकोनॅझोल (१.५०% एफएस) (संयुक्त कीटकनाशक व बुरशीनाशक) २ मि.लि. त्यानंतर ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम, रायझोबिअम २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी) २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या अनुक्रमाने बीजप्रक्रिया करून पेरणी करावी.
  • चवळी, सोयाबीन, एरंडी या सारखी सापळा पिके भुईमूग पिकाच्या चारही बाजूंनी लावावीत. यामुळे मुख्य पिकावर मावा व तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.  भुईमूग पिकांमध्ये प्रत्येक १० ओळीनंतर एक ओळ चवळी या सापळा पिकाची लागवड करावी. यामुळे रस शोषक कीड विशेषतः मावा आकर्षित होते. यावर मित्रकीटकांचे संवर्धन होऊन संख्येत वाढ होते. 
  • भुईमूग पिकामध्ये मका आंतरपीक घेतल्यास फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते. 
  • रस शोषक किडींच्या प्रभावी व्यवस्थापनाकरिता २० ते २५ पिवळे निळे चिकट सापळे लावावेत. 
  • पीक लागवडीनंतर ४० दिवसांपर्यंत शेत तणविरहित ठेवावे. शेतात व धुऱ्यावर बावची वनस्पती असल्यास ती उपटून नष्ट करावी. स्पोडोप्टेरा अळीचा प्रादुर्भाव  रोखण्यास मदत होते.  कीड व रोग प्रादुर्भावग्रस्त पाने, अंडीपुंज असलेली पाने, जाळीदार पाने गोळा करून अळीसह नष्ट करावीत.  
  • हेक्टरी पाच प्रकाश सापळे, ३० ते ४० पक्षी थांबे लावावेत. तंबाखूचे पाने खाणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणाकरिता हेक्टरी ५ आणि कीड व्यवस्थापनाकरिता प्रति हेक्टरी १० कामगंध सापळे लावावेत. त्यातील ल्युर, प्रलोभने शिफारशीत वेळेत बदलावेत. 
  • लष्करी अळीच्या (स्पोडोप्टेरा लिट्यूरा) एस.एल.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशक ५०० मि.लि. प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी.  किडींचा प्राथमिक स्वरूपाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास निंबोळी अर्क (५%) किंवा कडूनिंब आधारीत कीटकनाशक ॲझाडिरॅक्टिन (३०० पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे  वापर करावा.  व्यवस्थापनाचे सर्व उपाय वापरल्यानंतरही किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक झाल्यास शेवटचा पर्याय म्हणून शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. 
  • संपर्क- डॉ. प्रमोद मगर, ७७५७०८१८८५,  (विषय विशेषज्ञ -कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT