आंबा कलमांना सेंद्रिय आच्छादन
आंबा कलमांना सेंद्रिय आच्छादन  
ॲग्रो गाईड

आंबा, संत्रा, मोसंबी फळबाग सल्ला

डॉ. यू. एन. आळसे, डी. डी. पटाईत, डॉ. एस. जी. पुरी

सद्यस्थितीत पावसाळा संपल्याने फळबागेला योग्य पाणीव्यवस्थापन करणे गरजेचे आहे. सिंचनासाठी शक्यतो ठिबकसिंचन पद्धतीचा अवलंब करावा. ते शक्य नसल्यास झाडाभोवती आळे करून त्यावर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. त्यामुळे अतिरिक्त सिंचनही होणार नाही; तसेच जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचे योग्य व्यवस्थापनही होईल. आंबा :

  • नवीन लागवड केलेल्या कलमांना काठीचा आधार द्यावा. वाढत्या उन्हापासून संरक्षणासाठी कलमांना सावली करावी.
  • नवीन लागवड केलेल्या कलमांभोवती आळे तयार करावे. जमिनीतून होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी काडीकचरा किंवा वाळलेले गवत यांचे आच्छादन करावे.
  • जमिनीच्या मगदूरानुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ठिबकसिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
  • संत्रा, मोसंबी :

  • मृगबहर धरलेल्या बागेस जमिनीच्या मगदुरानुसार १२ ते १५ दिवसांनी पाणी द्यावे. पाणी देताना दुहेरी बांगडी पद्धतीने आळे करुन पाणी द्यावे. किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
  • आंबे बहर धरण्यासाठी जमिनीची चांगली मशागत करुन घ्यावी. प्रत्येक झाडास चांगले कुजलेले शेणखत ४०-५० किलो व स्फुरद ४०० ग्रॅम, पालाश ४०० ग्रॅम अशी खतमात्रा द्यावी. स्फुरद व पालाश या खतांची मात्रा दुपारी पडलेल्या झाडाच्या सावलीच्या बाहेर कुदळीने गोल खोदून द्यावी. खत टाकून झाल्यावर मातीने झाकावे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बागेस हलके पाणी द्यावे.
  • झाडाच्या खोडाजवळ नांगरट करताना अत्यंत वर-वर नांगर चालेल अशापद्धतीने करावी. खोलवर नांगरटी केल्यास झाडाची मुळे तुटतात. तसेच आंतरमशागत करताना झाडाचे खोड किंवा फांद्यांना इजा पोचणार नाही याची काळजी घ्यावी.
  • संपर्क : ०२४५२-२२९००० (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

    Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

    Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

    Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

    Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

    SCROLL FOR NEXT