शेवगा खत व्यवस्थापन
शेवगा खत व्यवस्थापन 
ॲग्रो गाईड

शिफारशीनुसार द्या शेवग्याला खतमात्रा

अंबादास मेहेत्रे, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. एस. एच. पठाण

शेवगा पिकाला शेणखताबरोबरच माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर करावा. सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यास शेंगाचे प्रमाण, रंग, चकाकी आणि प्रत सुधारते. शेवग्याचा शेंडा जास्त वाढत असल्यास नत्र वापर कमी करावा. शेवग्याला वर्षातून दोनदा बहार येतो. त्यामुळे बहार घेताना खतांचा वापर करणे गरजेचे आहे. छाटणी झाल्यावर मात्र एकदा शेणखत वापरावे. शेणखताबरोबरच रासायनिक खतांचा वापर करावा. एकरी ५० किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे खत द्यावे. त्यानंतर ३० ते ४० दिवसांनी पुन्हा एकदा एकरी ५० किलो युरिया द्यावा. माती परीक्षणानुसार जमिनीचा प्रकार आणि झाडाची वाढ यानुसार नत्राचे प्रमाण कमी-जास्त करावे.

  • पहिला बहार निघाल्यानंतर नवीन पालवी फुटून फुले येऊ लागतात. अशावेळी पुन्हा एकदा वरीलप्रमाणे खतांचे नियोजन करावे.
  • अशाप्रकारे वर्षातून दोनदा रासायनिक खतांचा वापर करावा. शक्य असल्यास सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यास शेंगाचे प्रमाण, रंग, चकाकी आणि प्रत सुधारते. शेवग्याचा शेंडा जास्त वाढत असल्यास नत्र वापर कमी करावा. शेंगांची फुगवण कमी होत असल्यास तसेच फूलगळ कमी होऊन शेंगांची संख्या वाढविण्यास स्फुरद खतांचा वापर जास्त करावा.
  •            ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन

    अवस्था    खते     कालावधी/मात्रा
    फुले लागेपर्यंत    १९:१९:१९   दर आठवड्याला एकरी ५ कि. प्रमाणे
    फुले लागल्यानंतर     १२:६१:०, १३:००:४५   आलटून पालटून दर आठवड्याला एकरी ५ कि. प्रमाणे
    शेंगा फुगवण्यासाठी     ००:५२:३४, ०:००:५०   आलटून पालटून दर आठवड्याला एकरी ५ कि. प्रमाणे

    सुधारित जाती :

  • तमिळनाडू कृषी विद्यापीठ - पीकेएम-१ (कोईमतूर-१,), पीकेएम-२ (कोईमतूर-२) हे वाण लवकर शेंगा येणारे व भरपूर प्रथिने असलेले आहेत. शेंगा दोन ते अडीच फूट लांब, पोपटी रंग, भरपूर आणि चविष्ट गराच्या असल्याने देशांतर्गत तसेच परदेशातही चांगली मागणी आहे.
  • कर्नाटकातील बागलकोट कृषी विद्यापीठाने भाग्या ही जात बारमाही उत्पादनासाठी विकसित केली आहे.
  • दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण रुचिरा ही जात विकसित केली आहे. या शेंगांची लांबी १.५ ते २ फूट असून शेंगा त्रिकोणी आकाराच्या असतात. पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी ३५ ते ४० किलो शेंगा मिळतात.
  • संपर्क : अंबादास मेहेत्रे, ९५४५३२३९०६ , डॉ. उल्हास सुर्वे, ९८२२६०६५११ (कृषी विद्या विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

    Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

    Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

    Education Fund : रानमसलेच्या प्राथमिक शाळेसाठी ‘लक्ष्मी’कडून सव्वा कोटींचा निधी

    Lake Conservation : जैवविविधतेच्या बळावर ‘त्या’ करतात तलावाचे संवर्धन

    SCROLL FOR NEXT