ZP Education Agrowon
ॲग्रो विशेष

ZP School : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढीसाठी प्रशासन सक्रिय

Rural Education : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घटती विद्यार्थीसंख्या किंवा कमी पटसंख्या चिंतेचा विषय आहे. खासगी शाळांत विद्यार्थ्यांची गर्दी वाढत आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शुकशुकाट होत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घटती विद्यार्थीसंख्या किंवा कमी पटसंख्या चिंतेचा विषय आहे. खासगी शाळांत विद्यार्थ्यांची गर्दी वाढत आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शुकशुकाट होत आहे. या स्थितीत जिल्हा परिषदेचे प्रशासन सक्रिय झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मीनल करनवाल यांनी थेट विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थांना पटसंख्या वाढीसंबंधी आवाहनपर पत्र दिले आहे.

हे पत्र संबंघित तालुक्यांत दिले जात आहे. त्यात पालकांनी आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी किंवा प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशित करावे, जिल्हा परिषद शासनाची यंत्रणा असून, गुणवत्ता व ग्रामविकास यासंबंधीचे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.

या पत्रांचे वितरण विविध गावे, मोठ्या ग्रामपंतायतींच्या स्तरावर पालकांना वितरित करण्यात येत आहे. त्यासाठी शिक्षण विभाग सक्रिय आहे. गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आदी या कामात सध्या कार्यरत आहेत. तसेच विविध शाळांमधील शिक्षक, केंद्र शाळांमधील पदाधिकारीदेखील सक्रिय झाले आहेत.

याबाबत नुकताच शिरसोली (ता.जळगाव) येथे कार्यक्रम झाला. त्यात शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, केंद्रप्रमुख सुशील पवार, मुख्याध्यापिका मेघा परदेशी, चंदू बंजारा यांच्या उपस्थितीत पत्र वितरण करण्यात आले. तसेच महाराजस्व अभियानांतर्गत शिक्षण विभागाने स्टॉल लावून जनजागृती केली.

पाचवीपर्यंतचे वर्ग चालविणे झाले कठीण....

पुढील आठवड्यात जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू आहे. मोठी शहरे, तालुक्याच्या भागानीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहेत. जेथे सातवीपर्यंत वर्ग होते, तेथे आता पाचवीपर्यंतचे वर्ग चालविणे कठीण झाले आहे.

कारण विद्यार्थ्यांना त्यांचे पालक शिक्षणासाठी खासगी शाळा, इंग्रजी माध्यमांच्या विद्यालयात प्रवेशित करीत आहेत. त्यासाठी मोठे शुल्कही भरण्यास पालक तयार आहेत. या स्थितीत पालकांना आवाहन करणारे पत्र जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने ग्रामीण भागात देण्यास सुरुवात केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT