Pune ZP Agrowon
ॲग्रो विशेष

Pune ZP Land Development: जिल्हा परिषदेच्या जागा होणार विकसित; ‘सीईओं’चा पुढाकार

Business hubs in Market Yard and Kothrud: पुणे जिल्हा परिषदेच्या कोथरूड, मार्केट यार्ड, कोरेगाव पार्क आणि बिबवेवाडीतील जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: पुणे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मार्केट यार्ड, कोथरूड, कोरेगाव पार्क, बिबवेवाडी अशा महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या जागा आता विकसित करण्यात येत आहेत. या ठिकाणी व्यापारी संकुल, गाळे, मॉल उभारण्यात येणार असून, त्यादृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा परिषदेला कायमस्वरूपी उत्पन्नाचा नवा स्रोत मिळणार आहे.

राज्यातील सर्वांत मोठी जिल्हा परिषद असलेल्या पुणे जिल्हा परिषदेकडून शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा वापराविना पडून आहेत. या जागेचा वापर जिल्हा परिषदेकडून केला जात नाही. त्यामुळे या जागेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले आहे. कित्येक वर्षांपासून या विषयावर चर्चा होते.

मात्र, पुढे काहीच कार्यवाही होताना दिसत नाही. आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी हा विषय प्राधान्याने हाती घेतला आहे. त्यांनी त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या मालकीची मार्केट यार्ड येथे ३० गुंठे कोथरूड येथे सुमारे एक एकर, तसेच कोरेगाव पार्क, बिबवेवाडी येथे काही प्लॉट आहेत. मार्केट यार्डातील सुमारे ३० गुंठे जागेवर गोदाम आहे. या ठिकाणी ‘उमेद’ बचत गटांना भाडेतत्त्वावर व्यापारी गाळे देण्याचा विचार सुरू आहे. त्याच ठिकाणी झेडपीचे रेकार्ड ठेवण्यात येणार आहे.

याच ठिकाणी व्यापारी संकुल बांधण्याचा प्रयत्न आहे.कोथरूड येथील डहाणूकर कॉलनी येथे जिल्हा परिषदेची एक एकर जागा आहे. या ठिकाणी मोठे मॉल उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने बांधकाम व इमारतीच्या रचना तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आले आहे. येथील जागेवर जिल्हा परिषदेला उत्पन्न मिळेल.

पुणे शहरात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या सर्व ठिकाणच्या जागेची पाहणी केली. या जागा आता विकसित करण्यात येणार आहेत, तसेच मार्केड यार्ड, कोथरूड येथे व्यापारी संकुल, गाळे, मॉल उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे.
गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT