Zero Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Zero Tillage : कार्बन क्रेडिटसाठी शून्य मशागत तंत्रज्ञान फायदेशीर

Carbon Credit : शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करून तुरीचे पीक, आंबा फळबाग, सीताफळाची बाग, लिंबू फळबाग याची माहितीही त्यांनी दिली.

Team Agrowon

Akola News : स्थानिक सातपुडा नॅचरल शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकाराने रविवारी (ता. ८) शून्य मशागत तंत्रज्ञानावर आधारित शेती व्यवसाय व जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवून कार्बन क्रेडिटची निर्मिती या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती.

सातपुडा नॅचरल शेतकरी उत्पादक कंपनीचे चेअरमन रूपेश पाटील लडे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी विलास वाशीमकर यांनी शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. कृषी उद्योजक सुभाष गोरे यांनी प्रास्ताविक केले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून संवर्धित शेती शून्य मशागत तंत्रज्ञानाचा प्रसार मृद विज्ञान तज्ज्ञ विजय कोळेकर यांनी केला. याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केल्याचे रूपेश पाटील म्हणाले. आपण स्वतः शून्य मशागत पद्धतीचा अवलंब करून आपल्या संपूर्ण शेतीचे व्यवस्थापन करतो. त्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना त्यांनी दाखविले.

शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करून तुरीचे पीक, आंबा फळबाग, सीताफळाची बाग, लिंबू फळबाग याची माहितीही त्यांनी दिली. भरपूर मशागत व वारंवार नांगरणीमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब हवेत विरघळून जातो व पर्यायाने पिकाला आवश्यक असलेले अन्नद्रव्य कमी पडत असल्यामुळे उत्पन्नात घट होते, असेही त्यांनी सांगितले.

विलास वाशिमकर यांनी आपल्या मार्गदर्शनात शून्य मशागत तंत्रज्ञानातील महत्त्वाच्या टप्प्याबाबत मार्गदर्शन केले. शून्य मशागतीचे फायदे भविष्यात कार्बन क्रेडिटसाठी होणार आहेत. शून्य मशागत तंत्रज्ञानावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबतची माहिती या कार्यशाळेत या वेळी देण्यात आली.

या कार्यशाळेला अकोला जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते. तसेच नाशिक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आवर्जून शून्य मशागत तंत्रज्ञानाचा प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आले होते. कंपनीचे संचालक प्रमोद चव्हाण यांनी समारोप केला. सूत्रसंचालन श्रीमती मोहिनी मोडक यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT