Moong Yellow Mosaic Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Moong Crop Disease: रिसोडला उन्हाळी मुगावर ‘पिवळ्या मोझॅक’चा प्रादुर्भाव

Yellow Mosaic: रिसोड तालुक्यातील उन्हाळी मुगावर 'पिवळ्या मोझॅक' रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या रोगामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

 गोपाल हागे

Washim News: रिसोड तालुक्यात उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या मुगावर पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मुगाचे पीक संकटात सापडले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील काही वर्षांपासून सिंचनाच्या सुविधेत वाढ झाल्यामुळे तसेच या पिकावर शेतकऱ्यांचा अधिक भर असल्यामुळे उन्हाळी हंगामात मुगाची लागवड वाढली आहे. हे पीक दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत तयार होते.

पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी उडीद व मूग पिकाची लागवड केली आहे. दरवर्षीच्या अनुभवावरून एकरी चार ते पाच क्विंटलपर्यंत या पिकाचे उत्पादन मिळते.

परंतु या वर्षी उन्हाळी मुगावर पिवळ्या मोझॅकचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. एकूण क्षेत्रातील जवळपास ७० ते ८० टक्के झाडांची पाने पिवळी पडली आहेत. महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही काही परिणाम न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

प्रादुर्भाव झालेली झाडे उपटून शेताबाहेर टाकण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. परंतु ७० ते ८० टक्के झाडांवर प्रादुर्भाव झाल्यामुळे हे शक्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मी दरवर्षी दोन एकरांमध्ये उन्हाळी मुगाची पेरणी करतो. या वर्षी सोयाबीनला भाव न मिळाल्यामुळे झालेली तूट भरून काढण्यासाठी मी चार एकरांवर मुगाची पेरणी केली. परंतु सर्वच पीक पिवळे पडले आहे. त्यामुळे केलेला खर्च व मेहनत वाया गेली आहे.
भुजंग सरकटे, शेतकरी, मोहजा इंगोले, ता. रिसोड, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT