Yavatmal ZP Agrowon
ॲग्रो विशेष

Yavatmal ZP Budget : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात १४ कोटीने वाढ

Surplus Budget : जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सलग चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यंदा बजेटमध्ये १४ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

Team Agrowon

Yavatmal News : जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सलग चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यंदा बजेटमध्ये १४ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. अर्थसंकल्पात ४२ कोटी ८१ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात नावीन्यपूर्ण योजनांवर भर देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

अर्थसंकल्पात मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रमाची अंमलबजावणी, जुन्या पंचायत समितीच्या जागेवर कॉम्प्लेक्स, अल्पभूधारक शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर स्पायरल सेप्रेटर, ई-ऑफिस, तसेच निपुण भारत अभियानावर तरतूद केल्याची माहिती प्रशासक तथा सीईओ मंदार पत्की यांनी दिली. गेल्या वर्षी २८ कोटी ५८ लाख रुपयांचा अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली होती.

२०२५-२६ साठी १४ कोटीने वाढ करून ४२ कोटी ८१ लाखांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. गेल्या वर्षीचा खर्च आणि अखर्चीत निधीच्या आधारावर यंदा विभागानुसार तरतूद करण्यात आली आहे. बांधकाम विभाग एक आणि दोन, शिक्षण, कृषी, सामान्य प्रशासन, महिला व बालकल्याण आदी विभागांना झुकते माप देण्यात आले आहे.

शिक्षण विभागासाठी ३ कोटी ५१ लाख ५० हजार, बांधकाम एक १० कोटी ४३ लाख, बांधकाम२ एक कोटी ६४ लाख, कृषी तीन कोटी ३५ लाख ३६ हजार, समाजकल्याण एक कोटी ३८ लाख ३३ हजार, महिला व बालकल्याण विभाग दोन कोटी ४२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेनंतर पंचायत समितीमध्ये ई-ऑफिस प्रणाली केली जाणार आहे. यासाठी तीन कोटीची तरतूद केली आहे.

पाच कोटीतून बांधणार ‘कॉम्प्लेक्स‘

शहराच्या मध्यवस्तीत जुन्या पंचायत समितीची खुली जागा आहे. याठिकाणी ‘शॉपिंग कॉम्प्लेक्स‘चे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांधकाम एक विभागाकडे पाच कोटी रुपयांची तरतूद केली. एका वर्षांत बांधकाम पूर्ण करण्याचा संकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT