Drought Agrowon
ॲग्रो विशेष

Yavatmal Drought : यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळावर मोहोर ; अंतिम पैसेवारी ४८ टक्के ; वर्षभरात शेतकऱ्यांवर अनेक संकटे

Yavatmal Paisewari : नजरअंदाज व सुधारित पैसेवारीत जिल्ह्यातील पीकस्थिती काहीशी उत्तम दाखविण्यात आली होती. अंतिम पैसेवारीत जिल्ह्यातील शेतीची विदारक स्थिती पुढे आली आहे.

Team Agrowon

Yavatmal News : यवतमाळ : नजरअंदाज व सुधारित पैसेवारीत जिल्ह्यातील पीकस्थिती काहीशी उत्तम दाखविण्यात आली होती. अंतिम पैसेवारीत जिल्ह्यातील शेतीची विदारक स्थिती पुढे आली आहे. प्रशासनाने अंतिम ४८ पैसेवारी प्रसिद्ध केल्याने दुष्काळावर शिक्कामोर्तब झाले आहे.

जिल्ह्यातील शेतकरी गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळाच्या चक्रव्यूहात अडकला आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच किडीरोगाच्या प्रभावामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात मोठा फटका सहन करावा लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांची अवस्था तशीच आहे. अतिवृष्टी, पूर व त्यानंतर अवकाळीने शेतकऱ्यांची कोंडी केली. नैसर्गिक आपत्तीनंतर रोगराई तसेच किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकांना फटका बसला. याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे.

शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन घटले आहे. पिकांचे भाव पडल्याने शेतकरी चारही बाजूने घेरला गेला आहे. गेल्या ३० सप्टेंबरला जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी जाहीर झाली. जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांत पावसाने शेतपिकांचे नुकसान झाले, असे असले तरी जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ६१ आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. सुधारित काही प्रमाणात नुकसान दिसून आले होते. मात्र, पैसेवारी ५४ होती. अंतिम पैसेवारीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांना मदतीसाठी अंतिम पैसेवारी महत्त्वाची मानली जाते. यंदा कापूस, सोयाबीन, तूर या महत्त्वाच्या पिकांसोबत इतर पिकांना फटका बसल्याने उत्पादनात घट झाली. २०२४-२५ या वर्षातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४८ आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात दोन हजार १५९ गावे आहेत. त्यात लागवडीसाठी योग्य असलेल्या गावांची संख्या दोन हजार ४६ एवढी आहे. या सर्व गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली असून दुष्काळावर शिक्कामोर्तब झाला आहे.

११३ गावांची पैसेवारी बाकी

जिल्हा प्रशासनाने ११३ गावांची पैसेवारी काढलेली नाही. यात यवतमाळ तालुक्यातील १७, कळंब दोन, बाभूळगाव सात, आर्णी पाच, दिग्रस एक, पुसद चार, उमरखेड २२, महागाव तीन, केळापूर ११, घाटंजी १५, राळेगाव एक, वणी सात, मारेगाव सात तर झरीजामणी तालुक्यातील अकरा गावांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय पैसेवारी

यवतमाळ ४७

कळंब ४८

बाभूळगाव ४८

आर्णी ४८

दारव्हा ४७

दिग्रस ४९

नेर ४७

पुसद ४९

उमरखेड ४८

महागाव ४७

केळापूर ४९

घाटंजी ४८

राळेगाव ४८

वणी ४८

मारेगाव ४८

झरी जामणी ४९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT