Awards Agrowon
ॲग्रो विशेष

Amrut Maha Awas Award : ‘यशवंत पंचायत राज,’‘अमृत महाआवास’ पुरस्कार वितरण

Team Agrowon

Nagar News : विभाग स्तर व राज्यस्तरावर राज्यातील पंचायतराज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना ‘यशवंत पंचायत राज व अमृत महाविकास अभियान’ पुरस्काराचे विभागीय आय़ुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते वितरण केले आहे. नगर जिल्ह्याला यात सर्वाधिक १४ पुरस्कार मिळाले आहेत.

विभाग, राज्यस्तरावर व्यवस्थापन व विकास कार्यात चांगले काम करणाऱ्या काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींसाठी ‘यशवंत पंचायत राज’ पुरस्कार योजना सुरु केली. २०२०-२१, २०२२-२३ कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांना पुरस्कार वितरण केले.

शिवाय ‘अमृत महाआवास’ अभियान पुरस्काराचेही वितरण झाले. यात यशवंत पंचायतराज अभियान राज्यस्तर पुरस्कार २०२२-२३ मध्ये राहाता पंचायत समितीला तिसरे, विभागस्तरावर (२०२०-२१ व २०२२२३ मध्ये प्रत्येकी पहिले, संगमनेर पंचायत समितीला तिसरे, बक्षिस मिळाले. याशिवाय नगर जिल्हा परिषदेचे सहायय्क लेखाधिकारी प्रदीप काशिनाथ वर्पे, ग्रामविकास अधिकारी एकनाथ ढाकणे, आरोग्य पर्यवेक्षक अजय चौधरी, राहात्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, वरिष्ठ सहाय्यक अशोक कदम यांनी गुणवंत अधिकारी, कर्मचारी पुरस्कार मिळाले. महाआवास योजनेचा नगर जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाला.

प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यात पाथर्डी तालुक्याला प्रथम क्रमांक, कर्जतला तृतीय क्रमांक, प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत मालेवाडी (ता.पाथर्डी) प्रथम आली. विभागातील सर्वोत्कृष्ट बहुमजली गृहसंकुलात कर्जतला तिसरे बक्षीस मिळाले. सर्वोत्कृष्ट गृहसंकुल (हाऊसिंग अपार्टमेंट) मध्ये वागदरी, ता.श्रीगोंदा ग्रामपंचायत तृतीय आली.

महाआवासमध्ये सर्वोत्कृष्ट कामात अहमदनगर जिल्हा पहिला आला. तर राज्य पुरस्कृत आवासयोजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यात जामखेड प्रथम, शेवगाव द्वितीय व नेवासा तृतीय आला. राज्य पुरस्कृत आवास योजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींत अरणगाव (ता. जामखेड) प्रथम, गोलेगाव, (ता.शेवगाव) द्वितीय व आले. राज्य पुरस्कृत आवास योजनेंअंतर्गत विभागातील सर्वोत्कृष्ट गृहसंकुल उभारण्यात नांदगाव (ता. नगर) ग्रामपंचायत पहिली आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT