Land Agrowon
ॲग्रो विशेष

Land Dispute : चुकीच्या सल्ल्याने होते फसगत

Rural Story : एका गावात दोन भाऊ राहत होते. थोरल्या भावाचे नाव शशिकांत व धाकट्या भावाचे नाव दत्ता. दोघेही भाऊ गावात राहून शेती करत होते.

शेखर गायकवाड

Land Information : एका गावात दोन भाऊ राहत होते. थोरल्या भावाचे नाव शशिकांत व धाकट्या भावाचे नाव दत्ता. दोघेही भाऊ गावात राहून शेती करत होते. थोरल्या भावाने म्हणजे शशिकांतने ही जमीन स्वतः खरेदी केली होती. त्या शेतीमधून त्यांना चांगले पीक सुद्धा मिळत होते. शेतजमिनीचा सातबारा थोरल्या भावाच्या म्हणजे शशिकांतच्या नावावर होता, दत्ताचे नाव सातबाराला नव्हते.

काही वर्षांनंतर शशिकांतने आर्थिक अडचणीमुळे शेतजमीन विकण्याचा निर्णय घेतला. धाकट्या भावाकडे म्हणजे दत्ताकडे पुरेसे पैसे होते. त्याला असे वाटत होते, की आपला भाऊ जमीन विकत आहे, तर ती जमीन आपण खरेदी करावी. पण थोरला भाऊ शशिकांतने त्याच्या धाकट्या भावाला जमिनीचा भाव खूप जास्त सांगितल्यामुळे तेवढी रक्कम दत्ता देण्यास तयार नव्हता.

काही दिवसांनंतर शशिकांतने ती जमीन जास्त दराने गावातील तिऱ्हाईत व्यक्तीला विकली. खरेदी घेणाऱ्या शशिकांतचे नाव सातबाराला लावण्यापूर्वी दत्ताने तलाठ्याला तक्रार अर्ज देऊन माझ्या भावाने परस्पर जमीन विकल्यामुळे खरेदीची नोंद रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली.

आपला भाऊ आपल्याला डावलून तिऱ्हाईत माणसाला जमीन विकू शकत नाही, असे त्याचे म्हणणे होते. परंतु प्रत्यक्षात मंडळ अधिकारी यांनी दत्ताची तक्रार पूर्णपणे फेटाळून लावली. मंडळ अधिकाऱ्याने दत्ताला सांगितले, की ज्याच्या नावावर जमीन आहे ती व्यक्ती कोणालाही जमीन विक्री करू शकते. असे काही नाही की त्याने ती जमीन कुटुंबातील व्यक्तीलाच विकली पाहिजे. सातबारावर तुमच्या भावाचे नाव असल्यामुळे तुम्ही त्यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही.

सांगावयाचे तात्पर्य म्हणजे महसूल अधिकारी हे केवळ हक्कांची नोंदणी करणारे आहेत. शिवाय हक्क दस्तऐवजाने निर्माण होतो. केवळ फेरफार नोंदीने कोणताही हक्क निर्माण होत नाही किंवा नष्ट होत नाही. अनेक वेळा चुकीचा सल्ला मिळाल्यामुळे शेतकरी भलत्याच दरवाजावर डोके ठेवून आपले डोके फोडून घेत असतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT