Marathi Literary Convention  Agrowon
ॲग्रो विशेष

Marathi Literary Convention : नाशिक येथे डिसेंबरमध्ये होणार विश्‍व मराठी संमेलन

Marathi Literature Event : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणारे विश्‍व मराठी साहित्य संमेलन यंदा नाशिकमध्ये २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात होणार आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणारे विश्‍व मराठी साहित्य संमेलन यंदा नाशिकमध्ये २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात होणार आहे. या संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी कार्यालय सुरू करून नियोजनाचा नियमितपणे आढावा घ्यावा, अशा सूचना उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात विश्‍व मराठी संमेलनाच्या नियोजनासंदर्भात आढावा नुकतीच बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार सीमा हिरे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकुमार देवरे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, मराठी भाषा विभागाचे उपसचिव डॉ. नामदेव भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, समीक्षक डॉ. रमेश वरखेडे, उद्योजक धनंजय बेळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, साहित्यिक उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, की अभिजात मराठी भाषेच्या वैश्विक प्रचार आणि प्रसारासाठी जगभरातील मराठी भाषकांनी एकत्र येऊन एकाच व्यासपीठावर सर्वांगीण चर्चा व्हावी म्हणून विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सहकार्य मिळणार आहे. या संमेलनानिमित्त विविध कार्यक्रम होतील.

उत्तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा स्पर्श लाभलेला असेल. या संमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात येतील. या संमेलनाचे कार्यालय नाशिक येथे १६ ऑगस्ट २०२५ पासून कार्यान्वित होईल. या कार्यालयाच्या माध्यमातून संमेलनाच्या तयारीचा नियमितपणे आढावा घेण्यात येईल. या संमेलनात अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असेल, असे नियोजन करण्यात येईल.

या संमेलनात पुस्तक आदान-प्रदान उपक्रम असेल. या वर्षाच्या सुरुवातीला पुणे येथे झालेल्या संमेलनात हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्याला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

पुणे येथील संमेलनात ३५ हजार वाचकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला होता, असे सांगत मंत्री सामंत यांनी मराठी साहित्याची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून मराठी साहित्य संग्रहालय स्थापन करण्यात येईल. त्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सहकार्य लाभणार असल्याचे या वेळी सांगितले. या वेळी समीक्षक डॉ. वरखेडे, कुलगुरू डॉ. सोनवणे, ॲड. ठाकरे यांच्यासह उपस्थित साहित्यिकांनी विविध सूचना केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT