Training Workshop Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Care : ‘रेबीज’मुळे जनावरांचे मृत्यू रोखण्याविषयी कार्यशाळा

Training Workshop : पशू विज्ञान महाविद्यालयात पशुवैद्यकीय अधिकारी व महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

Team Agrowon

Latur News : पशुसंवर्धन विभाग व नागपूरच्या महाराष्ट्र पशू व मत्स्य विद्यापीठाच्या वतीने बुधवारी (ता. ३१) उदगीर येथील पशुवैद्यकीय आणि पशू विज्ञान महाविद्यालयात पशुवैद्यकीय अधिकारी व महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. ‘रेबीजमुळे (श्‍वानदंश/अलर्क) होणारे प्राण्यांमधील मृत्यू रोखण्यासाठी करावयाच्या उपचारातील बदल व निदानासाठी मेंदू उती संकलन’ हा कार्यशाळेचा विषय होता.

उपचारात बदल केल्यास रेबीजमुळे होणारे प्राण्यांचे मृत्यू रोखणे शक्य असल्याचे मत पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहसंचालक डॉ. नाना सोनवणे यांनी कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी व्यक्त केले. पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. झेड. गायकवाड अध्यक्षस्थानी होते.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. कदम यांनी रेबीज (श्‍वानदंश/अलर्क) या रोगाच्या प्राण्यामधील व मनुष्यातील व्याप्तीबद्दल व होणाऱ्या शेतकऱ्याच्या नुकसानीबाबत माहिती दिली. जिल्हा पशू संवर्धन अधिकारी डॉ. श्रीधर शिंदे यांनीही मार्गदर्शन केले.

महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. अशोक भोसले यांनी उपचारात बदल करून रेबीजमुळे होणारे मृत्यू कसे रोखता येऊ शकतात, याची माहिती देत लसीकरणासोबत रिगचा वापर केल्यास श्‍वान बाधित रेबीजचे संक्रमण यशस्वीपणे रोखू शकतो, असे स्पष्ट केले.

कार्यशाळेत रेबीज रोगाच्या निदानासाठी मेंदू उती संकलन करण्याच्या सोप्या पद्धती व हे रोगनिदान करण्यास उपयुक्त चाचण्यांचे प्रात्यक्षिक दाखवून व त्यांचे सखोल आकलन करण्यात आले. यासाठी सहायक संचालक डॉ. प्रकाश धोंड, पशुधन विकास अधिकारी डॉ. विजयकुमार घोंशीकर, डॉ. गोपाळ भारकड, डॉ. मोहमद रझीउद्दिन, डॉ. सुरेश घोके, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. अनु कुमारी व डॉ. झनक यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीत २०१९ मधील पुनर्गठित कर्जाचा विचार करावा, रणधीर सावरकरांची विधानसभेत मागणी

Sangli Water Storage: सांगलीतील प्रकल्पांत अवघा १९ टक्के पाणीसाठा

Farmers Protest: सरसकट कर्जमाफीसाठी आज पारनेर तहसीलवर जनआक्रोश मोर्चा

Vegetable Cultivation Delayed: सांगलीत भाजीपाला लागवड रखडली

Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT