Sharad Pawar  Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : सेंद्रिय शेतीवर शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यशाळा

Organic Farming : राज्यभर सेंद्रिय शेतीमध्ये वाढ होत आहे. पण सेंद्रिय शेती उत्पादनांना शाश्‍वत बाजारपेठ मिळत नसल्यामुळे शेतकरी सेंद्रिय शेतीबाबत खूष नाहीत.

सुदर्शन सुतार

Solapur News : महाऑरगॅनिक अँड रेसीड्यू फ्री फार्मर्स असोसिएशनच्या (मोर्फा) वतीने मंगळवेढा येथे शेतकऱ्यांसाठी शुक्रवारी (ता. १९) सेंद्रिय शेती कार्यशाळा आयोजिण्यात आली असून, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अॅड. भारत पवार व हरिभाऊ यादव यांनी पत्रकारांना दिली.

मंगळवेढा येथे शुक्रवारी दुपारी दीड वाजता गोपणबाई विहिरीसमोरील सामी फॅमिली क्लब अँड रिसॉर्टमध्ये ही कार्यशाळा होईल. खासदार शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, ‘मोर्फा’चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे हे या वेळी उपस्थित राहणार आहेत.

राज्यभर सेंद्रिय शेतीमध्ये वाढ होत आहे. पण सेंद्रिय शेती उत्पादनांना शाश्‍वत बाजारपेठ मिळत नसल्यामुळे शेतकरी सेंद्रिय शेतीबाबत खूष नाहीत. तसेच महाराष्ट्रातील जमिनीची सुपीकता संपत चाललेली असून, जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमालीचा घटत आहे,

जमिनीचे आरोग्य चिंताजनक अवस्थेत आहे. नागरिकांनाही सेंद्रिय व विषमुक्त शेती उत्पादने मिळत नसल्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडत चालले आहे.

यासाठी शेतकरी व ग्राहक यांचा समन्वय करून सेंद्रिय शेती उत्पादनांना चांगले मार्केट मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे अॅड. पवार व यादव यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Crisis: होरपळीच्या सुलतानी झळा

Onion Procurement Irregularities: ‘खरे’ उत्तर मिळेल?

Water Shortage Management: पुणे जिल्ह्यात टंचाईमुळे पाणी नियोजनाला वेग

Marathwada Climate Monitoring: मराठवाड्यात हवामान अभ्यास, संशोधन केंद्राची गरज

Agricultural Pump Theft: दुष्काळात तेरावा महिना; कृषिपंपांसह केबलची चोरी

SCROLL FOR NEXT