Mazi Ladki Bahin Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Yojana : ‘माझी लाडकी बहीण’साठी समन्वयाने काम करावे : स्वामी

IAS Dilip Swami : ‘‘मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवून प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे,

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : ‘‘मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवून प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे,’’असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’, ही योजना शासनाने जाहीर केली असून, २८ जून रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार अंमलबजावणीसाठी कालमर्यादा देण्यात आली आहे. त्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले.

१ जुलैपासून अर्ज घेण्यास सुरुवात, तर १५ जुलैपर्यंत अर्ज देण्याची मुदत आहे. १६ रोजी तात्पुरत्या यादीचे प्रकाशन, ता. १६ ते २० दरम्यान तात्पुरत्या यादीवर हरकती प्राप्त करणे, २१ ते ३० तक्रारी व हरकतींचे निराकरण, १ ऑगस्ट अंतिम यादी प्रकाशन, १० ऑगस्टपर्यंत लाभार्थ्यांचे बॅंकांमध्ये ई- केवायसी करणे, १४ ऑगस्टला लाभार्थ्यांच्या निधीचे हस्तांतर याप्रमाणे असेल.

यासंदर्भात सोमवारी (ता. १) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. लाभार्थ्यांचे अर्ज ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांच्या स्तरावर घेतले जातील. नागरी भागात अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, वॉर्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज घेतले जातील.

श्री. स्वामी म्हणाले, ‘‘ही नोंदणी निरंतर सुरू राहणार असल्याने महिलांनी एकदम गर्दी करू नये.’’

...असा आहे लाभार्थी निकष

राज्यातील रहिवासी असणाऱ्या २१ ते ६० वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता निराधार महिला. महिलांचे बॅंक खाते आवश्यक. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लक्ष रुपयांपेक्षा जास्त नसावे. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे १५०० रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा.

...ही कागदपत्रे आवश्यक

ऑनलाइन अर्ज, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र / जन्म दाखला, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, बॅंक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, अटी शर्ती पालनाबाबतचे हमी पत्र.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra ST Bus Service Issues: राजकारणासाठी एसटी प्रवासी वेठीला

MAGNET Projects Schemes: ‘मॅग्नेट’अंतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा

Neem Research Centre: भिडीत कडुलिंब संशोधन केंद्र होणार

MSCB Profit: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ७०२ कोटींचा नफा

NABARD Experience Centre: मुंबईत नाबार्डच्या अनुभव केंद्राचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT