Onion Export  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी मागे घ्या

Onion Market : देवळा तालुकाध्यक्ष माणिक निकम यांच्या ८ नेतृत्वाखाली ‘रास्ता रोको’ करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे देवळा-नाशिक मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली होती.

Team Agrowon

Nashik News : कांदा निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर घसरले असून, केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी देवळा येथे पाचकंदीलवर शुक्रवारी (ता.९) स्वतंत्र भारत पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण आहिरे, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस, देवळा तालुकाध्यक्ष माणिक निकम यांच्या ८ नेतृत्वाखाली ‘रास्ता रोको’ करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे देवळा-नाशिक मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली होती.

८ डिसेंबर २०२३ पासून कांदानिर्यात बंदीची अंमलबजावणी झाली. त्यानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत कांद्याची निर्यातबंदी केली आहे. मात्र कांदा निर्यात बंदी केल्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सद्य:स्थितीत उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

याआधी कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लादून जवळपास अघोषित निर्यात बंदी केंद्र शासनाने लादली होती. हाच निर्णय मागे घेत पुन्हा कांद्यावर किमान निर्यात मूल्य प्रतिटन ८०० डॉलर करण्यात आले.

त्यातून सावरत कांद्याला योग्य दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना केंद्र सरकारने खरीप हंगामात पहिल्यांदाच कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणले.

कांदा निर्यातबंदी मागे न घेतल्यास येऊ घातलेल्या निवडणुकीत शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवून देतील अशा पद्धतीने नाराजी व्यक्त करत ही निर्यातबंदी तत्काळ मागे घेण्याची मागणी केली. याबाबत मागण्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, देविदास आहेर, विनोद आहेर, शेतकरी संघटनेचे देवळा तालुका उपाध्यक्ष किरण निकम, डॉ. राजेंद्र ब्राह्मणकर, नंदू जाधव, विलास शिंदे आदींसह स्वप्नील आहेर, संदीप निकम, मनोज आहेर, विशाल निकम, हेमंत निकम, तानाजी निकम, कैलास कोकरे, माधव निकम, हरिश्‍चंद्र निकम, विठ्ठल महाजन, बाळासाहेब शेवाळे सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT