Tur Import Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Import : खुल्या तुर आयातीला दिलेली मुदतवाढ मागे घ्या : किसान सभा

केंद्र सरकारने मुक्त आयातीला एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षीही अशाच प्रकारे तूर आयात करण्यात आली. त्यामुळे देशात ८ लाख ६० हजार टन तूर आयात झाली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला.

Team Agrowon

केंद्र सरकारने तूर आयातीबाबतचे (Tur Import) धोरण तातडीने मागे घ्यावे, तूर आयातीला दिलेली खुली आयात (Free Import Tur) परवानगी तातडीने रद्द करावी व तुरीचा वाढता उत्पादन खर्च पहाता शेतकऱ्यांना तुरीसाठी किमान ९००० रुपये भाव मिळेल अशी धोरणे घ्यावीत, अशी मागणीही किसान सभेने (Kisan Sabha) प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. केंद्र सरकार घोषणा आत्मनिर्भरतेच्या करत असले तरी प्रत्यक्ष कृती मात्र देशाला परावलंबी करणारी करणारी आहे, अशी टीकाही किसान सभेने केली आहे.

केंद्र सरकारने मुक्त आयातीला एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षीही अशाच प्रकारे तूर आयात करण्यात आली. त्यामुळे देशात ८ लाख ६० हजार टन तूर आयात झाली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. शेतकऱ्यांच्या तुरीला हमीभावापेक्षाही कमी दर मिळाला. त्यामुळे शेतकरी तूर लागवडीकडे पाठ फिरवायला लागली आहेत. शेतकऱ्यांनी तुरीची लागवड कमी केली तर भविष्यात तूर आयातीवर देशाला अवलंबून राहावे लागेल, अशी भीती किसान सभेने पत्रकात व्यक्त केली आहे.

मागील वर्षी तुरीचा आधारभाव ६३०० रुपये जाहीर करण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांना आयात तुरीमुळे आधारभावापेक्षा कमी दराने तूर विकावी लागली. किफायतशीर भाव न मिळाल्याने शेतकरी तूर उत्पादनाकडे पाठ फिरवत असल्याचा हा परिणाम असल्याचेही पत्रकात म्हंटले आहे.

तुरीची देशांतर्गत गरज ४४ ते ४५ लाख टन इतकी आहे. गत वर्षी देशात तुरीचे चांगले उत्पादन झाले. गरजेच्या तुलनेत ४३ लाख ५० हजार टन तुरीचे उत्पादन झाले असताना तूर आयात करण्याची आवश्यकता नव्हती. मात्र केंद्र सरकारने अशाही परिस्थितीत ८ लाख ६० हजार टन तूर आयात केली. परिणामी तुरीचे भाव कोसळले. सरकारने तूर आयातीला दिलेली मुदतवाढ मागे घ्यावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Rahul Mahiwal: ‘कृषी उद्योजक’ घडविणारी व्यवस्था आणू

PICNIC Farming Technology: ‘पिकनिक’ शेती, अर्थात निसर्गसिद्ध संजीवन शेती

Strawberry Pest Control: स्ट्रॉबेरीवरील लाल कोळी

Germany Agriculture Technology: गुट स्टाइनहॉफ जर्मनीतील शेतीची अनोखी गाथा

Interview with Sunil Patil: दरवाढीच्या संकटातही शेतकरी हिताला प्राधान्य

SCROLL FOR NEXT