Banana Crop Loss: Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Loss: वादळी पावसाचा केळी पिकाला तडाखा; नांदेड-हिंगोलीमध्ये मोठे नुकसान

Farmer Distress: नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने आणि जोरदार वाऱ्याने शेतकऱ्यांच्या केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

Sainath Jadhav

Nanded,Hingoli News: नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने आणि जोरदार वाऱ्याने शेतकऱ्यांच्या केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात आणि नांदेडच्या अर्धापूर,मुदखेड आणि भोकर तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली.

या वादळामुळे केळीची झाडे मोडली,फळे खराब झाली आणि शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले.शेतकऱ्यांनी तातडीने सरकारी मदत आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा भागात वादळी वाऱ्यासह पावसाने केळीच्या बागांना जोरदार तडाखा दिला.

अनेक शेतकऱ्यांचे दीड ते दोन एकरांवरील केळी पीक उद्ध्वस्त झाले.केवळ एका तासात झालेल्या वादळी पावसाने शेकडो हेक्टरवरील केळी बागा आडव्या झाल्या. नांदेडमध्येही परिस्थिती वेगळी नाही. सोमवारी (09जून ) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने आणि वादळाने अर्धापूर,मुदखेड आणि भोकर तालुक्यांतील केळी पिकांचे मोठे नुकसान झाले.

रात्रीच्या वेळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्याने केळीची झाडे जमीनदोस्त झाली.स्थानिक प्रशासनाने पंचनामे सुरू केले असून,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची याचना केली आहे.हवामान खात्याने पुढील काही दिवसांत आणखी पावसाचा अंदाज वर्तवला असून,शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT