Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Council : साखर कारखाने एकरकमी पहिली उचल देणार का?

Swabhimani Shetkari Sanghtana : उसाला एकरकमी पहिली उचल ३७०० रुपये द्या, मगच उसाला कोयता लावा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषदेत दिला.

Team Agrowon

Sangli News : उसाला एकरकमी पहिली उचल ३७०० रुपये द्या, मगच उसाला कोयता लावा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषदेत दिला. मात्र सध्या जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीचे रणांगण सुरू झाले असल्याने साखर कारखानदार निवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळीत गुंतले आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदार एकरकमी पहिली उचल देणार का? साखर कारखाना प्रशासन पहिली उचल देण्याचे मान्य करणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला असून, कारखानदार काय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गतवर्षीच्या हंगामात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी द्या, अन्यथा गाळप सुरू होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी देण्याबाबत हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दराचा तोडगा सोडवण्यासाठी बैठका झाल्या. मात्र, त्यातूनही तोडगा सुटला नसल्याने आंदोलन केले.

त्यामुळे हंगामाला अडथळा निर्माण झाला होता. यंदाचा ऊस हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, एफआरपी किती मिळणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे. गेल्या आठवड्यात जयसिंगपूर येथे ऊस परिषद झाली. या ऊस परिषदेत यंदाच्या हंगामात ऊसदर विनाकपात एकरकमी पहिली उचल ३७०० रुपये द्या, मगच उसाला कोयता लावा, असा इशारा कारखानदारांना दिला.

येत्या बारा ते पंधरा दिवसांत यंदाचा गाळप हंगाम सुरू होईल. साखर कारखानदारांनी त्यासाठी नियोजनही केले आहे. जिल्ह्यात येत्या दोन ते तीन दिवसांत ऊसतोडणी मजूर दाखल होतील. मात्र, जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा माहोल सुरू झाला आहे. साखर कारखानदार निवडणुकीत गुंतले आहेत.

निवडणुकीचे वातावरण रंगू लागले आहे. प्रचाराच्या तोफा सुरू होतील. जिल्ह्यातील बहुतांश कारखानदार निवडणुकीत उभे आहेत. त्यामुळे उमेदवार मतदार संघात प्रचारात असणार आहेत. साखर कारखाने गाळप हंगाम सुरू करतील, पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला पहिली उचल ३७०० रुपयांची मागणी केली आहे. ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पवित्रा घेणार का, साखर कारखान्याचे प्रशासन ही मागणी मान्य करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT