Bacchu Kadu Agrowon
ॲग्रो विशेष

Bacchu Kadu: शेतकरी आत्महत्याप्रश्‍नी ‘सिंदूर यात्रा’ काढणार : कडू

Sindoor Yatra: आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचा सिंदूर पुसला गेला, म्हणून रामटेक ते दीक्षाभूमी आणि हिंगोली ते नांदेड अशी ‘सिंदूर यात्रा’ काढण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.

Team Agrowon

Yavatmal News: आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचा सिंदूर पुसला गेला, म्हणून रामटेक ते दीक्षाभूमी आणि हिंगोली ते नांदेड अशी ‘सिंदूर यात्रा’ काढण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील गहुली येथे स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतिस्थळावरून मंगळवारी (ता. २९) श्री. कडू बोलत होते. त्यांनी सांगितले, की सरकारला अनेकदा कर्जमाफीसंदर्भात विनंती करूनही दखल घेतली जात नसल्याने आता आंदोलनाची धार अधिक तीव्र केली जाईल.

राज्यातील विविध भागांतून शेतकऱ्यांच्या मागण्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. त्यातच कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, सरकारच्या धोरणांविरोधात आता रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंगळवारी श्री. कडू यांनी राज्यभरातून आलेल्या विविध शेतकरी प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर सर्वांच्या सहमतीने आंदोलनाची दिशा निश्‍चित करण्यात आली. बैठकीच्या पूर्वी कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.

दोन ऑक्टोबरपासून ‘भगतसिंगगिरी’

बच्चू कडू यांनी स्पष्ट केले, की येत्या २ ऑक्टोबरपासून गांधीगिरी सोडून ‘भगतसिंगगिरी’ सुरू होईल. याच दिवशी गावागावांतून ट्रॅक्टर मोर्चे निघतील आणि शेवटी ते विधानभवनावर धडकतील. शेतकऱ्यांचा आवाज आता ऐकून घेणे सरकारला भाग पडेल, असा रोखठोक इशाराही त्यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Price Crisis : कांदा उत्पादकांचा एल्गार; पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको, पोलिसांनी नेत्यांना घेतलं ताब्यात

Onion Farmers Crisis: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल; मंत्री बावनकुळे यांची माहिती

Soil Centric Farming: मृदाकेंद्रीत शेती विकासासाठी पुढचे पाऊल

Dairy Business Success: शेतीला दुग्ध व्यवसायाची सक्षम जोड

Wheat Procurement : गव्हाच्या सरकारी खरेदीत नवा उच्चांक; ३४९ लाख टन धान्याची खरेदी

SCROLL FOR NEXT