Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar News: एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार: शरद पवार

NCP President : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती.

Team Agrowon

Sharad Pawar Resign News : येत्या एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार. तुम्हाला हवा तसा निर्णय घेणार आहे, असं म्हणत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं.

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती.

वाय बी चव्हाण सेंटरच्या बाहेर कार्यकर्ते दोन दिवसांपासून घोषणाबाजी करत अन्नत्याग करून बसलेली होती. पवारांनी कार्यकर्त्यांशी गुरुवार (ता.४) संवाद साधला.

"पक्षाच्या भवितव्यासाठी मी राजीनाम देण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेताना सहकाऱ्याशी चर्चा करण्याची गरज होती. परंतु मला खात्री होती की, तुम्ही हा निर्णय मान्य केला नसता. त्यावेळी तुम्हाला विश्वासात घेतले नाही. आता मला वाटते की, तुम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते. " असे पवार म्हणाले.

कार्यकर्त्यांचा भावनेचा मी आदर करतो. तुम्हाला आंदोलनाची गरज पडू देणार नाही. तुम्हाला हवा तो निर्णय येत्या एक दोन दिवसात घेतो, असंही पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Belem Conference: प्रश्न हवामानाचा, बाता मात्र उद्योगाच्या

Edible Oil Import: अन्वयार्थ आयात घटीचा!

MGNREGA: ‘मनरेगा’चे नाव बदलल्यावरून कोल्हापुरात निदर्शने

Farmer Scientist Forum: शेतकरी- शास्त्रज्ञ मंच कौतुकास्पद उपक्रम

Banana Farming: खानदेशात कांदेबाग केळी लागवडीत घट

SCROLL FOR NEXT