Agriculture Education Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Education : पहिलीपासून कृषी अभ्यास सुरू करणार

Agriculture Study : पहिलीपासून कृषी अभ्यास सुरू करण्यासाठी कृषी विभाग आणि शालेय शिक्षण विभागामध्ये करार झाला असल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दापोली येथे दिली.

Team Agrowon

Ratnagiri News : पहिलीपासून कृषी अभ्यास सुरू करण्यासाठी कृषी विभाग आणि शालेय शिक्षण विभागामध्ये करार झाला असल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दापोली येथे दिली.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कार्यक्रमासाठी आलेल्या मंत्री केसरकर यांनी पत्रकारांशी रविवारी (ता. २४) संवाद साधला. शैक्षणिक धोरणामध्ये बदल करण्यासाठी राज्य शासनाकडून पावले उचलली जात आहे.

पर्यावरण संतुलन बिघडल्याचे परिणाम वातावरणावर होत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुलांमध्ये जागृती करण्यासाठी सकारात्मक पावले शिक्षण विभागाकडून उचलली जात असल्याचेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.

पहिलीपासून कृषी अभ्यासक्रम सुरू केला तर जनजागृती होईल. चालू शैक्षणिक वर्षात याची सुरुवात करण्यात येणार आहे. या बाबत मंत्री केसरकर म्हणाले की, मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण होण्यासाठी पहिलीपासून अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

पर्यावरणाचे संतुलन बिघडले असल्याचे आपण फक्त बोलत राहतो. त्यात बदल करण्यासाठी आपल्याला निसर्गाशी नाते जोडायला पाहिजे. त्यासाठी कृषीशिवाय पर्याय नाही.

त्यामुळेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शेतीकडे वळा, असा संदेशही दिला जाणार आहे. कृषी विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यामध्ये करार झाला आहे. त्याची अंमलबजावणी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT